SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून हायप्रोफाइल वेश्याव्यवसाय चालवणारा मुख्य फरार आरोपी करवीर पोलिसांच्या जाळ्यातजयसिंगपूर येथे वित्तीय जागरूकता व साक्षरता कार्यक्रम संपन्नलिंगायत समाजाच्या न्याय्य मागण्यांना आमदार यड्रावकर यांचा जाहीर पाठिंबा कागलमधील राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुतळा अनावरण कार्यक्रम 'न भूतो न भविष्यति' करूया.... !जैन समाजाच्या हितासाठी व नवीन पिढीसाठी दक्षिण भारत जैन सभेचे योगदान महत्वपूर्ण : पालकमंत्री प्रकाश आबिटकरराधानगरी भरले 99.51 टक्के; कोल्हापूर जिल्ह्यातील 33 बंधारे पाण्याखालीकेंद्र सरकारकडून राज्यांना १ लाख हजार कोटींचे कर वितरणगणित आणि संख्याशास्त्रामध्ये ‘एआय’चा पाया: कुलगुरू डॉ. राजनीश कामततरुणाईने समाजाला शिक्षण आणि सत्यशोधक विचारांकडे न्यावे : मंत्री हसन मुश्रीफ लंडनची 'टॉवर सबवे': जगातील पहिली भूमिगत ट्यूब रेल्वे

जाहिरात

 

राधानगरी भरले 99.51 टक्के; कोल्हापूर जिल्ह्यातील 33 बंधारे पाण्याखाली

schedule02 Aug 26 person by visibility 99 categoryराज्य

कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 8.32 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सायंकाळी 4 च्या अहवालानुसार राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे क्र.6 हा खुला असून सध्या धरणातून स्वयंचलित व्दारामधून 1428 व पावर हाऊसमधून 1400 असा एकूण 2828 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, कासारी नदीवरील- यवलूज व ठाणे आळवे, भोगावती नदीवरील- सरकारी कोगे, खडक कोगे, हळदी, राशिवडे व तारळे कुंभी नदीवरील- सांगरुळ व कळे दूधगंगा नदीवरील- दत्तवाड व सुळकूड, वारणा नदीवरील – चिंचोली, माणगाव, कोडोली, खोची, दानोळी व शिगाव वेदगंगा नदीवरील- निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे व चिखली हिरण्यकेशी नदीवरील- निलजी,  तुळशी नदीवरील- कसबा बीड व ताम्रपर्णी नदीवरील चंदगड व कुर्तनवाडी असे एकूण 33 बंधारे पाण्याखाली आहेत.

जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा (कंसात एकूण टक्केवारी )- राधानगरी 8.32 (99.51 टक्के), तुळशी 3.08 (88.67 टक्के), वारणा 29.76 (86.52 टक्के), दूधगंगा 17.97 (70.78 टक्के), कासारी 2.35 (84.60 टक्के), कडवी 2.52 (100 टक्के), कुंभी 2.52 (81.70 टक्के), पाटगाव 2.75 (73.93 टक्के), चिकोत्रा 0.91 (59.85 टक्के), चित्री 1.89 (100 टक्के), जंगमहट्टी 1.22 (100 टक्के), घटप्रभा 1.56 (100 टक्के), जांबरे 0.82 (100 टक्के), आंबेआहोळ 1.19 (96.33 टक्के), सर्फनाला 0.67 (100 टक्के), धामणी 1.29 (100 टक्के) टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 32.11, सुर्वे 32.00, रुई 62.2, इचलकरंजी 59.3, तेरवाड 54.3 शिरोळ 51.28 , नृसिंहवाडी 50.00 फूट इतकी पाणीपातळी आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes