SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सुवर्णझेप! मीराबाई चानूचा इतिहास; ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला पहिले सुवर्ण पदक!घरकुलांमुळे संपूर्ण कुटुंबाचेच जीवनमान आणि राहणीमान उंचावते : मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादनपैशांअभावी शस्त्रक्रिया थांबणार नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसडीकेटीईच्या २९ विद्यार्थींनींची कॅपजेमिनी या नामांकीत कंपनीमध्ये आकर्षक पॅकेजवरती निवडजिल्हाधिकारी कार्यालय येथे 27 वा कारगिल विजय दिवस साजराडी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या ६३८ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांत निवडजलसंपदा विभागाकडून शेतकऱ्यांशी संबंधित सर्वच प्रक्रिया ऑनलाईन करणार : जलसंपदा मंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील​"मी गोकुळची निवडणूक लढवणार नाही"महसूल सुविधा प्रत्येक गावापर्यंत पोहोचविण्यासाठी कटिबद्ध : आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकरकारगिल विजय दिवस: भारतीय शौर्य, पराक्रम आणि बलिदानाचा सुवर्णदिन

जाहिरात

 

डीकेटीईच्या २९ विद्यार्थींनींची कॅपजेमिनी या नामांकीत कंपनीमध्ये आकर्षक पॅकेजवरती निवड

schedule26 Jul 26 person by visibility 146 categoryशैक्षणिक

इचलकरंजी : येथील डीकेटीई संस्थेच्या इंजिनिअरींग विभागाच्या तब्बल २९ विद्यार्थीनींची जागतिक किर्तीची आयटी कंपनी कॅपजेमिनी, पुणे येथे आकर्षक वेतन पॅकेजवर निवड झाली आहे. स्पर्धात्मक आयटी क्षेत्रात मिळालेले हे यश डीकेटीईच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा, उद्योगाभिमुख प्रशिक्षणाचा आणि विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीचा ठसा उमटवणारे ठरले आहे.
कॅपजेमिनी ही फ्रान्सस्थित जागतिक दर्जाची आयटी, कन्सल्टिंग आणि डिजीटल ट्रान्सफॉर्मेंशन क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी आहे.

 कंपनीच्या पुणे कार्यालयामार्फत आयोजित कॅम्पस भरती प्रक्रियेत देशभरातील गुणवंत विद्यार्थ्यांमधून डीकेटीईच्या २९ मुलींची निवड करण्यात आली. या प्रक्रियेत डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनींनी आपल्या तांत्रिक ज्ञान, विश्‍लेषणात्मक क्षमता आणि आत्मविश्‍वासाच्या जोरावर यशस्वी कामगिरी नोंदवली. प्लेसमेंट प्रक्रियेमध्ये अ‍ॅप्टीटयूड टेस्ट, टेक्निकल मुलाखात आणि एच.आर. अशा तीन टप्प्यांचा समावेश होता. प्रत्येक टप्प्यांत विद्यार्थींनींनी उत्कृष्ट कामगिरी करत आपली गुणवत्ता सिध्द केली.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणा-या डीकेटीईमध्ये प्लेसमेंटपूर्व विशेष प्रशिक्षण, अ‍ॅप्टीटयूड डेव्हलपमेंट, तांत्रिक मार्गदर्शन, मॉक इंटरव्हयुव, संवाद कौशल्य आणि व्यक्तीमत्व विकास यावर सातत्याने भर दिला जातो. उद्योगांच्या अपेक्षांनुसार दिल्या जाणा-या या प्रशिक्षणामुळे डीकेटीईचे विद्यार्थी देशातील नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये सातत्याने यश मिळवत असून, संस्थेची उत्कृष्ट प्लेसमेंट परंपरा अधिक भक्कम करीत आहेत.

यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये कॉम्प्युटर विभागातूनः अहिल्या हपटे, मानसी कुरडे, ॠुतूजा भुते, श्रुती होगाडे, नम्रता जाधव, साक्षी पाटील, वैष्णवी सावंत, प्रणोती आठवले, साक्षी बडे.एआयएमएल विभागातून ः श्रुती खवाटे, प्रियंका लंगोटे, पलक सारस्वत, अलिषा अत्तार, इशिता मेहता, सानिका पाटील, समिक्षा हेरवाडे, पूर्वा पवार, गौतमी पाटील. एआय डाटा सायन्स विभागातूनः सानिया चव्हाण, साक्षी आरगे, श्रुती बोरा, अश्‍विनी पवार, तौसिया फकिर. इएनटीसी विभागातूनः आर्या दरीबे, मृणाली घनवट, प्रतिक्षा खडसरे, वैष्णवी पवार, विजयलक्ष्मी थावरे व पौर्णिमा जाधव.
डीकेटीई संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ सपना आवाडे कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व विश्‍वस्त यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

 विद्यार्थ्यांना संस्थेच्या संचालिका प्रा.डॉ.एल.एस.आडमुठे, विभागप्रमुख डॉ एस.के.शिरगावे, डॉ. डी.व्ही. कोदवडे, डॉ सौ जे.पी. खरात, डॉ टी.आय.बागबान, टीपीओ प्रा.जी.एस. जोशी त्याचबरोबर सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes