डीकेटीई टेक्स्टाईलच्या २१ विद्यार्थ्यांची वेलस्पनमध्ये निवड
schedule30 Jun 25 person by visibility 291 categoryशैक्षणिक

इचलकरंजी : डीकेटीईच्या टेक्स्टाईल विभागातील अंतिम वर्षातील २१ विद्यार्थ्यांची नामांकित अशा वेलस्पन या इंडस्ट्रीमध्ये निवड झाली आहे. वेलस्पनच्या वापी, अंजार, हैद्राबाद येथील युनिटसाठी कंपनीने डीकेटीईच्या विद्यार्थ्यांची निवड केली. त्याचबरोबर तृतीय वर्षातील १९ विद्यार्थ्यांची प्रिप्लेसमेंट साठी ऑफर दिलेली आहे.
वेलस्पन ही कंपनी टेरी टॉवेल, शीटींग फॅब्रिक्स, नॉनवोव्हन फॅब्रिक्स, इत्यादी विविध विभागानी युक्त आहे. वेलस्पन ही वस्त्रोद्योगातील विख्यात अशी कंपनी दरवर्षी डीकेटीईस भेट देते व विद्यार्थ्यांची निवड करते. याही वर्षी वेलस्पन कंपनीने रिटन टेस्ट, ग्रुप डिस्कशन व पर्सनल इंटरव्हयू अशा विविध चार फे-यांमधून विद्यार्थ्यांची बौध्दिक गुणवत्ता तपासून विविध विभागासाठी सिलेक्शन केले.
विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबरच शिक्षण घेतानाच जगभरातील विविध कंपन्यात प्रशिक्षणासाठी पाठविणारी व उत्तमोत्तम प्लेसमेंट करणारी डीकेटीई ही संस्था देशात आघाडीवर आहे.शिक्षणाबरोबरच प्लेसमेंट बाबतही आज पालक आणि विद्यार्थी विचार करत असतात. या दोन्ही क्षेत्रात डीकेटीई सर्वोत्तम कामगिरी करत आहे.
निवड झालेले विद्यार्थी ओंकार जुगळे, अथर्व तोडकर, पार्थ लाड, निकिता चव्हाण, ॠषिकेश उगदे, यश ढवळे, रोहित बुगड, अस्मिता बोलके, सलोनी पाटील, दामोदर लठ, संकेत खोत, मयुरेश टोनपे, प्रतिक गाट, साक्षी खोत, तृप्ती बागणे, वैष्णवी पाटील, कुमकुम नांदेडकर, डिप्लोमा विभागातील प्रेम स्वामी, सुचित्रा असबे, समिक्षा सातपुते व महेक मुल्ला.
प्लेसमेंट झालेल्या विद्यार्थ्यांचे डीकेटीई संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाणा आवाडे,माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ.सौ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे तसेच सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांना इन्स्टिटयूटचे संचालिका प्रा.डॉ.एल.एस.अडमुठे, उपसंचालक प्रा.डॉ.यु.जे. पाटील व ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफीसर प्रा. एस.बी. अकिवाटे यांचे मार्गदर्शन लाभले.