SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शरद सहकारी साखर कारखान्याच्या २५ व्या गळीत हंगामाचा रोलर पूजन सोहळा उत्साहातअजितदादांच्या आठवणी जनसेवा सप्ताहाच्या रूपाने जतन करूया!‘गोकुळ’तर्फे वारकऱ्यांना लोणंद व फलटण येथे साहित्य वाटप...राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा; २९ जुलैनंतरच हालचालींना वेग!सुहास देशपांडे यांना इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगमध्ये पीएच.डी.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा जिल्हा कार्यालयात २२ जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन​'शक्तीपीठ' महामार्गाला शेतकऱ्यांचा 'विठ्ठला'कडे धाव; पंढरपुरात मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून साकडे!स्वप्नांना आकार देणारे करिअर म्हणजे वास्तुकला : डॉ. ए. के. गुप्तादिल्लीवारी: राष्ट्रपती भवनात सादरीकरणासाठी सज्ज असलेल्या श्रीजा फाउंडेशनच्या कलाकारांचा खासदार महाडिकांकडून सत्कार​"होमिओपॅथी, आयुर्वेद आणि योग महाविद्यालयांसह ग्रामीण आरोग्य पथक परिसरातील अत्यावश्यक सुविधा जलदगतीने उभाराव्यात."

जाहिरात

 

रोटरी क्लब ऑफ गार्गीजचा १९ वा पदग्रहण सोहळा उत्साहात

schedule18 Jul 26 person by visibility 173 categoryसामाजिक

कोल्हापूर : रोटरी क्लब ऑफ  गार्गीजचा १९ वा पदग्रहण सोहळा डिस्ट्रिक्ट ३१७० चे इन्स्टॉलिंग ऑफिसर पीडीजी रो. नासिर बोरसदवाला यांच्या उपस्थितीत झाला. या क्लबच्या एजी रो. अरुंधती महाडिक आहेत.यावेळी मावळत्या प्रेसिडेंट रो. अंजली मोहिते यांनी क्लबच्या कार्याचा आढावा घेतला, तर मागील वर्षीच्या सेक्रेटरी रो. सविता पदे यांनी अहवाल वाचन केले आणि कार्यकारिणीने केलेल्या कामाविषयी सविस्तर विवेचन केले. 

 यानंतर रो. नासिर बोरसदवाला यांच्या उपस्थितीत २०२६-२७ साठी रो. सविता पदे यांनी प्रेसिडेंटपदाचा, रो. सीमा मालानी यांनी सेक्रेटरी पदाचा व  रो. हर्षदा नाईक यांनी ट्रेझरर पदाचा कार्यभार स्वीकारला. रो. सविता पदे यांनी नवीन कार्यकारिणीची घोषणा केली. यावेळी बोलताना रो. नासिर बोरसदवाला यांनी रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या वतीने २०२५-२६ या कालावधीत केलेल्या कामकाजाबाबत मावळत्या कार्यकारिणीचे अभिनंदन केले. खास करून यावेळी त्यांनी यामिनी प्रदर्शन उत्कृष्ट भरविले आणि पर्यावरणाचे महत्त्व शिवाय शालेय विद्यार्थिनीला सर्वांगीण मार्गदर्शन यावर गार्गीज क्लबने केलेल्या कामाचा विशेष उल्लेख केला, आणि २०२६ - २७ या नव्या कार्यकारिणीला चांगले काम  करण्याच्या शुभेच्छा दिल्या.  

 यावेळी  पीडीजी रो. प्रताप पुराणिक, पीडीजी रो. संग्राम पाटील, पीडीजी रो. श्रीनिवास मालू, ऐजी रो. हर्षवर्धन तायवाडे पाटील, रो. विक्रांतसिंह कदम, रो. सुहास जोशी, रो. अमित माटे,रो. अमरदीप पाटील, रो.प्रसन्न देशिंगकर व ऐजी रो. दीपिका मर्दा यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी सूत्रसंचालन रो. मधुलिका जगदाळे, रो. दुर्गा भिंगार्डे, रो. जया माहेश्वरी व रो. सुजाता लोहिया यांनी केले. तर आभार रो. सीमा मालानी यांनी मानले.

मावळत्या ट्रेझरर रो. हेमलता कोटकर यांच्यासह रो. शोभा तावडे, रो. कल्पना घाटगे, रो. बीना जनवाडकर, रो. साधना घाटगे, रो. विशाखा आपटे, रो. गौरी शिरगावकर रो. लक्ष्मी शिरगावकर, रो. मेघना शेळके, रो. गायत्री मेनन, रो. सुरेखा इंग्रोळे, रो. प्रिया आरगे, रो. सुप्रिया डोईजड, रो. गीता पाटील, रो. दीपिका कुंभोजकर, रो. आशा जैन, रो. ममता झंवर, रो‌. योगिनी कुलकर्णी, रो. अर्चना देशपांडे, रो. उन्नती सबनीस, रो. रेश्मा शहा, रो. रेखा सारडा, रो. शीतल मुथा, रो. मंजिरी मोरे,  रो. रुपाली मिरजे, रो. शीतल लवटे, रो. नंदिनी पटोडिया, रो. प्रीती मेनन, रो.सविता उपाध्ये इत्यादी रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या सदस्या व रोटरी मूव्हमेंट चे सर्व प्रेसिडेंट व सेक्रेटरी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes