SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात राज्यातील पहिला ‘महा-पल्स एआय’ आरोग्य प्रकल्प; १०४ शासकीय आरोग्य संस्था होणार डिजिटल यंत्रणेशी जोडल्या जाणार!बिरसा मुंडा जयंतीनिमित्त महापालिकेत अभिवादन; १७ नोव्हेंबरला शहरात आरोग्य व पोषण जनजागृती शिबिर६५ व्या राज्य हौशी नाट्य स्पर्धेस सोमवारपासून प्रारंभसंभाव्य चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर पशुखाद्य अनुदानासाठी गोकुळचा पुढाकारईद फेस्टिवलतर्फे आयोजित ‘दीनीयात ज्ञानस्पर्धे’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी!राजापूर बंधाऱ्यावर सीसीटीव्ही आणि कायमस्वरूपी कर्मचाऱ्याची नेमणूक करा : आमदार यड्रावकर यांच्या सूचना आंतरराष्ट्रीय विज्ञान आणि शांतता सप्ताह: विज्ञानाचा खरा अर्थ मानवी कल्याणासाठीशिवाजी विद्यापीठाच्या ६४व्या वर्धापनदिनानिमित्त ‘दिलखुलास’मध्ये कुलगुरु डॉ. कामत यांची विशेष मुलाखतपंडित नेहरू यांना विद्यापीठात अभिवादन'गोकुळ' दूध दरात लवकरच वाढ होणार? बुधवार-गुरुवारपर्यंत निर्णय शक्यता; नवे अध्यक्ष राजेश पाटील यांची माहिती

जाहिरात

 

६५ व्या राज्य हौशी नाट्य स्पर्धेस सोमवारपासून प्रारंभ

schedule15 Nov 26 person by visibility 85 categoryसामाजिक

कोल्हापूर : ६५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा,२०२६-२७ च्या प्राथमिक फेरीस सोमवार दि.१६ नोव्हेंबरपासून संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात प्रारंभ होत आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत ६५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे सांयकाळी ७ वाजता उद्घाटन होणार असून या स्पर्धेत एकूण २१ दर्जेदार व आशय संपन्न नाटकांचे सादरीकरण रसिक प्रेक्षकांसाठी करण्यात येणार आहे.  

 ही स्पर्धा संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात येत्या ९ डिसेंबरपर्यंत नाट्य प्रेमींसाठी नाममात्र दरात खुली राहणार असून राज्यातील विविध २४ जिल्हास्तरीय शहरातील केंद्रांवर या स्पर्धेचा १६ नोव्हेंबर रोजी शुभारंभ करण्यात येणार आहे.

 सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत मराठी रंगभूमी समृध्द करण्याकरीता विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.त्याचाच एक भाग म्हणून आतापर्यंत महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेची गौरवसंपन्न ६५ वर्षे अविरत वाटचाल चालू आहे.या वाटचालीतून देशाला,राज्याला अनेक नामवंत नाटककार, अभिनेते,तंत्रज्ञ व दिग्दर्शक मिळाले.
         त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक नवनवीन अभिनव प्रयोग करुन मराठी रंगभूमीस समृध्दतेचा तसेच वैश्विकस्तराचा दर्जा प्राप्त करुन दिला. या राज्य नाट्य हौशी स्पर्धेतील अनेक होतकरु दिग्दर्शकांना तसेच कलावंताना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्ह्यातील नाट्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवावी असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes