कळंबा येथे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी, अंबाबाई देवीच्या उत्सवानिमित्त आजपासून विविध कार्यक्रमाचे आयोजन
schedule07 May 25 person by visibility 325 categoryसामाजिक

कळंबा : येथील ग्रामदैवत श्री महालक्ष्मी, अंबाबाई देवीच्या उत्सवानिमित्त होम हवन, महाप्रसाद तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दिनांक 7 मे ते मंगळवार 13 मे रोजी पर्यंत विविध कार्यक्रम होणार आहे.
बुधवारी दिनांक सात मे रोजी सकाळी आठ ते 11 या वेळेत ज्ञानेश्वरी पारायण तसेच रात्री नऊ वाजता ह. भ. प. चैतन्य महाराज लातूरकर (बाल कीर्तनकार) यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. गुरुवार दिनांक 8 मे रोजी रात्री नऊ वाजता ह. भ. प. संतोष महाराज पुजारी - सातारा यांचा हास्यविनोद भारुडचा कार्यक्रम होणार आहे.
शुक्रवार दिनांक 9 मे रोजी रात्री नऊ वाजता श्री विठ्ठलपंथी संगीत सोंगी भजन मंडळ दुर्गुळेवाडी तालुका करवीर यांचा सोंगी भजनाचा कार्यक्रम होणार आहे. शनिवार दिनांक 10 मे रोजी प्राध्यापक जयवंत आवटे (रा. कुंडल) यांचे तुफान विनोदी कथाकथन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे .
रविवार दिनांक 11 मे रोजी सकाळी सात वाजता कात्यायनी देवीच्या भेटीस पालखी सोहळा होणार आहे. तर रात्री नऊ वाजता बजरंग दल कळंबा आयोजित ऐतिहासिक महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दिनांक 12 मे रोजी सकाळी सात वाजता होम हवन घरोघरी पुरणपोळीचा नैवेद्य दुपारी तीन वाजता सर्व महिलांसाठी कुंकुमार्चन सोहळा, रात्री आठ वाजता मुख्य पालखी सोहळा हनुमान भेटीस तसेच रात्री दहा वाजता श्रीदत्त सेवा संगीत सोंगी भजन मंडळ पंडेवाडी यांचा कार्यक्रम होणार आहे.
दिनांक 13 मे रोजी सकाळी नऊ वाजता श्री महालक्ष्मी मंदिरात श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली असून सकाळी 11 वाजता महाप्रसाद वाटप होणार आहे. रात्री दहा वाजता स्वर विठ्ठलाई कलाविष्कार प्रस्तुत गौरव माय मराठीचा हा मराठमोळा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री महालक्ष्मी अंबाबाई भक्तगण मंडळ कळंबा यांनी केले आहे.