SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कुरुंदवाड येथील "उदय भाऊ किंग" टोळी एक वर्षासाठी कोल्हापूर जिल्हयातुन हद्दपार !!पुणे विभागातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा तर कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारातंत्रज्ञान अधिविभागात अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन सेमिनारला प्रतिसादकोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी व्यापक बैठकीचे पालकमंत्र्याकडून ठोस आश्वासनमेन‌ राजाराम प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी घेतला योगासनाचा प्रात्यक्षिक अनुभवडी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाकडून उत्कर्ष आवळेकर, योगेश चिमटे यांना पीएच.डी.स्थानिक स्वराज संस्थांमध्ये माझी वसुंधरा अभियान ६.0 राबविणार : पंकजा मुंडेरोटरी क्लब शिरोली एमआयडीसीच्या वतीने व्होकेशनल अवॉर्ड पुरस्काराने मान्यवरांचा गौरव सामाजिक सकारात्मकता वाढविणारा : संग्राम पाटीलसकारात्मक ऊर्जाप्राप्तीसाठी योगसाधना आवश्यक : खासदार धनंजय महाडिक; शिवाजी विद्यापीठात ११व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ‘योग-संगम’ कार्यक्रमभक्ती आणि योगाच्या माध्यमातून आरोग्यदायी समाज निर्मितीसाठी प्रयत्न करूया : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जाहिरात

 

कुरुंदवाड येथील "उदय भाऊ किंग" टोळी एक वर्षासाठी कोल्हापूर जिल्हयातुन हद्दपार !!

schedule21 Jun 25 person by visibility 326 categoryगुन्हे

कोल्हापूर  : कुरुंदवाड येथील "उदय भाऊ किंग" या टोळीला एक वर्षासाठी कोल्हापूर जिल्हयातुन हद्दपार करण्यात आले. यामध्ये टोळी प्रमुख उदय  पाटील, सदस्य  रविंद्र  पाटील,  विशाल  कांबळे,  प्रशांत  पाटील,  सुनिल  मगदुम यांचा समावेश आहे.

शिरोळ तालुक्यासह कोल्हापूर जिल्हयाचे परिसरामध्ये सार्वत्रिक हितास बाधक अशा स्वरुपाचे अवैध गुन्हयांना परिणाम देणा-या "उदय भाऊ किंग "या नावाने कुख्यात असलेल्या टोळीचा टोळी प्रमुख १) उदय काकासो पाटील, रा. पाटील गल्ली दत्तवाड ता. शिरोळ, टोळीचे सदस्य २) रविंद्र काकासो पाटील रा. पाटील गल्ली दत्तवाड ता शिरोळ, ३) विशाल रामचंद्र कांबळे रा. दत्तवाडा ता. शिरोळ, ४) प्रशांत आण्णासाो पाटील, रा. पाटील गल्ली दत्तवाड ता. शिरोळ, ५) सुनिल कुमार मगदुम, रा. महाविरनगर दत्तवाड ता. शिरोळ यानी निर्माण केलेल्या टोळीच्या वाढत्या अवैध गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी व टोळीचे परिसरातील वास्तव्यामुळे बाधीत झालेले सामाजिक स्वास्थ पुनःप्रस्थापित करण्यासाठी, सहा पोलीस निरीक्षक, कुरुंदवाड पोलीस ठाणे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५५ प्रमाणे टोळी हद्दपारीच प्रस्ताव मा. पोलीस अधीक्षक तथा हद्दपारी प्राधिकारी साो यांचेकडे सादर केला होता.

कोल्हापूर जिल्हयाचे हद्दपारी प्राधिकारी तथा पोलीस अधीक्षक यांनी सदरच्या प्रस्तावांची निःपक्षपातीपणे चौकशी होणे करीता चौकशी अधिकारी म्हणुन उपविभागीय पोलीस अधिकारी, शाहुवाडी विभाग यांची नियुक्ती केली होती. त्यानी चौकशीअंती अहवाल हद्दपारी प्राधिकारी तथा पोलीस अधीक्षक , कोल्हापूर यांचेकडे सादर केला होता. चौकशी अधिकारी यांनी चौकशी दरम्यान व त्यानंतर  हद्दपार प्रधिकारी तथा पोलीस अधीक्षक, कोल्हापूर यांचे समक्ष वेळावेळी घेणेत आलेल्या सुनावणीवेळी टोळी प्रमुख व टोळी सदस्य यांना आपली बाजु माडंणेसाठी नैसर्गिक न्यायतत्वास अनुसरून पुरेशी संधी व अवधी दिला होता. घेणेत आलेल्या सुनावणीमध्ये त्यांनी निर्माण केलेल्या टोळीच्या माध्यमातुन टोळीच्या अवैध गुन्हेगारी कृत्यामुळे सर्वसामान्य नागरिक तसेच समाजामध्ये दहशत माजविणे व सामाजीक स्वस्थ्यास बाधा निर्माण करत असल्याचे स्पष्ट झालेले आहे.

सदर टोळीच्या वाढत्या गुन्हेगारीस प्रतिबंध व्हावा, सार्वजनिक शांतता, सुव्यवस्था, नागरीकांचे जिवित व मालमत्तेची सुरक्षा असे सार्वत्रीक हित लक्षात घेवुन, हृद्दपार प्रधिकारी तथा पोलीस अधीक्षक, मा.योगेश कुमार सारे यांनी दिनांक २०/०६/२०२५ रोजी "उदय किंग गैंग" या टोळींचे प्रमुखासह ५ इसमांना कोल्हापूर जिल्हयाचे हद्दीतुन एक वर्षाचे कालावधी करीता हद्दपारीचे आदेश पारित केले. पारित केलेल्या आदेशाची सहा पोलीस निरीक्षक, कुरुंदवाड पोलीस ठाणेचे यांनी अमंलबजावणी केली.

हद्दपार कारवाई केलेले इसम हे कोल्हापूर जिल्हयामध्ये कोणाला दिसून आल्यास नजीकचे पोलीस ठाणेस अथवा नियंत्रण कक्ष ०२३१-२६६२३३३ येथे संपर्क करुन माहिती द्यावी. माहिती देणा-याचे नाव गोपनीय ठेवले जाईल असे मा. योगेश कुमार, पोलीस अधीक्षक  कोल्हापूर यांनी नागरीकांना आवाहन केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes