SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी भाऊसाहेब फास्के यांची फेरनिवडवनकायदे, जैवविविधता व ड्रोन प्रशिक्षणावर एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात कोल्हापुरात उद्यापासून रमजान पर्वाला प्रारंभ; आज रात्री पहिली 'तरावीह'डॉ. संजय डी. पाटील यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षावकेआयटी मध्ये राष्ट्रीय स्तरावरील ‘ पायोनियर-२६’ चे आयोजन; ६००० स्पर्धकांच्या सहभागाने होणार सृजनशील तंत्रज्ञानाचे अमृत मंथनछत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या अभ्यासासाठी मालवण येथे अध्यासन केंद्र : सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार; शासनाकडून निधी मंजुरराज्यपालांच्या हस्ते सुरेश प्रभू यांच्या जीवनचरित्राचे प्रकाशनआयटीआयच्या दोन लाख विद्यार्थ्यांना मिळणार आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण : कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची संकल्पनाकोल्हापूर जिल्ह्यात CSR अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया अभियानमहाराष्ट्रातील राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या 7 जागांसाठी 16 मार्चला मतदान

जाहिरात

 

शिवजयंती निमित्त पन्हाळा गडावर 'मेगा पदयात्रा' दोन दिवसीय रक्तदान शिबिराचे आयोजन

schedule17 Feb 26 person by visibility 249 categoryसामाजिक

कोल्हापूर : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून, छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी किल्ले पन्हाळा येथे भव्य 'मेगा पदयात्रा' (My Bharat - Mera Yuva Bharat) आयोजित करण्यात आली आहे. भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या मार्गदर्शनानुसार कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले असून, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्यातील युवक, विद्यार्थी आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्यासाठी आवाहन केले आहे. 

ही 'मेगा पदयात्रा' १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ०८.३० वाजता पन्हाळा नगरपालिकेजवळील छत्रपती शिवाजी महाराज मंदिरापासून सुरू होईल आणि मयुर बागेपर्यंत काढली जाईल. या पदयात्रेत शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांसह सुमारे २००० विद्यार्थी सहभागी होणार आहेत. केवळ पदयात्राच नव्हे, तर सामाजिक बांधिलकी जपत दिनांक १८ आणि १९ फेब्रुवारी असे दोन दिवस रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. 

या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी पन्हाळ्याचे उपविभागीय अधिकारी श्री. समीर शिंगटे यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पन्हाळा तहसीलदार यांच्या माध्यमातूनही आवश्यक ती पूर्वतयारी पूर्ण करण्यात आली आहे.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने या 'मेगा पदयात्रेत' आणि 'रक्तदान शिबिरात' जास्तीत जास्त युवक, विद्यार्थी आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन शिवजयंतीचा उत्साह द्विगुणित करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes