SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गोकुळ दूधसंघाची निवडणूक ९० दिवसांत घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेशभारत सरकारच्या एनटीटीएम मिशन अंतर्गत डीकेटीईस १०.२१ कोटींचा प्रकल्प मंजुरछत्रपती शाहू महाराजांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादनआरक्षणाचे जनक आणि लोकराजा: राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादनजागतिक आहारमुक्त दिवस: शरीर आणि मनाच्या आरोग्याचा उत्सवगोकुळची निवडणूक लांबणीवर टाकणे लोकशाहीसाठी घातक; आमदार सतेज पाटील यांची टीकाजीवन प्राधिकरणावर गुरुवारी घागर मोर्चा; १३ गावांचा पाण्यासाठी एल्गारआमदार राजेंद्र पाटील - यड्रावकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षावप्रभावी पर्यावरण संवर्धन समन्वयातूनच शक्य : शिवाजी विद्यापीठातील गोलमेज परिषदेतील सूरडीकेटीईच्या सिव्हील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावर दमदार कामगिरी

जाहिरात

 

कोल्हापूर महानगरपालिकेत आज 'मंगळवारी ‘जनता दरबार’

schedule05 May 26 person by visibility 226 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर सौ. रुपाराणी निकम यांनी कोल्हापूर शहरातील नागरिकांच्या महानगरपालिकेमधील कामकाजामध्ये होत असलेल्या अडीअडचणी जलदगतीने सोडविण्यासाठी "जनता दरबार" चे आयोजन केले आहे.

 त्यानुसार मंगळवार, दि.5 मे 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात जनता दरबार घेण्यात येणार आहे. यासाठी संबंधीत नागरीकांनी सकाळी 11 ते 12 या वेळेत नागरीकांनी आपले अर्ज सादर करावेत. 

या जनता दरबारामध्ये महापौर म्हणून  रुपाराणी निकम नागरिकांच्या तक्रारी व मागण्या प्रत्यक्ष ऐकून घेणार आहेत. यावेळी आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्यासह विविध विभागांचे पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका व अधिकारी उपस्थित राहणार आहेत. ज्या तक्रारीबाबत कोर्टामध्ये दावे प्रलंबित आहेत अथवा सुरु आहेत असे अर्ज स्विकारले जाणार नाहीत.

 तरी शहरातील नागरिकांनी आपल्या तक्रारी लेखी स्वरूपात संबंधित कागदपत्रांसह सादर करावे, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes