कोल्हापूर महानगरपालिका : 28 झाडू, सफाई कामगारांच्या वारसांना नियुक्तीपत्रे
schedule01 May 25 person by visibility 487 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 65 व्या वर्धापन दिनानिमित्त लाड पागे कमिटीच्या शिफारशीनुसार कोल्हापूर महापालिकेत 28 झाडू व सफाई पात्र कामगारांच्या वारसांना आज पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्रे देण्यात आली.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरुन सेवानिवृत्त झालेल्या/ मयत कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसांना लाड पागे समिती शिफारशी या कामगारांच्या वारसांना नियुक्ती पत्रे देण्यास प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांची अंतिम मान्यता झाली होती. त्यानुसार 28 झाडू व सफाई पात्र कामगारांना ही नियुक्ते पत्रे शाहू स्टेडियम येथील कार्यक्रमात आज देण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.कार्तिकेयन, प्रशासक के.मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उप-आयुक्त पंडीत पाटील, कपिल जगताप, कामगार अधिकारी राम काटकर, सहा.अधिक्षक विश्वनाथ निकम उपस्थित होते.