SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी भाऊसाहेब फास्के यांची फेरनिवडवनकायदे, जैवविविधता व ड्रोन प्रशिक्षणावर एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात कोल्हापुरात उद्यापासून रमजान पर्वाला प्रारंभ; आज रात्री पहिली 'तरावीह'डॉ. संजय डी. पाटील यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षावकेआयटी मध्ये राष्ट्रीय स्तरावरील ‘ पायोनियर-२६’ चे आयोजन; ६००० स्पर्धकांच्या सहभागाने होणार सृजनशील तंत्रज्ञानाचे अमृत मंथनछत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या अभ्यासासाठी मालवण येथे अध्यासन केंद्र : सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार; शासनाकडून निधी मंजुरराज्यपालांच्या हस्ते सुरेश प्रभू यांच्या जीवनचरित्राचे प्रकाशनआयटीआयच्या दोन लाख विद्यार्थ्यांना मिळणार आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण : कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची संकल्पनाकोल्हापूर जिल्ह्यात CSR अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया अभियानमहाराष्ट्रातील राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या 7 जागांसाठी 16 मार्चला मतदान

जाहिरात

 

केआयटी आयोजित राष्ट्रीय स्तरावरील ‘आयडियाथॉन’ ची सांगता, ७१ इनोव्हेशन व सृजनशी कल्पनांचे तरुणाईकडून सादरीकरण

schedule17 Feb 26 person by visibility 246 categoryशैक्षणिक

कोल्हापूर  : केआयटी अभियांत्रिकी (प्रदत्त स्वायत्त) महाविद्यालयाच्या वतीने आयडियाथॉन-२५ या इनोव्हेशन व उद्योजकतेला प्रोत्साहन देणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेची अंतिम फेरी नुकतीच यशस्वीरित्या संपन्न झाली. नवउद्योजकांना प्रेरणा मिळावी त्यांच्यामध्ये प्रश्न सोडवण्याची  वृत्ती मूळ धरावी, इनोव्हेशन्स आणि स्टार्टअपला पोषक  वातावरण त्यांना मिळावे या हेतूने अशा स्पर्धेची योजना करण्यात आली.

नाविन्यपूर्ण कल्पना शोधणे, त्यातून निवडलेल्या नवीन नवीन कल्पनांना व्यावसायिक स्वरूप देण्याच्या हेतूने एक सक्षम लॉन्च पॅड त्यांना उपलब्ध करून देणे हे या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.

देशभरातील १०० संशोधक विद्यार्थी, प्राध्यापक, अभियांत्रिकी विज्ञान क्षेत्रातील संशोधक,उद्योजक यांनी उत्साह पूर्वक सहभाग नोंदवला. अत्यंत सृजनशील पद्धतीने सादर केलेल्या सर्व कल्पना या खरच विकसित भारताच्या वाटचालीच्या द्योतक होत्या. केआयटी च्या वतीने नवोउद्योजकांना शेती तंत्रज्ञान, आरोग्य तंत्रज्ञान, शिक्षण तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, आयओटी बेस्ड तंत्रज्ञान, मशीन लर्निंग आधी विविध विषयातील उत्तम संशोधन,स्टार्ट अप आयडीया या स्पर्धेसाठी अपेक्षित होत्या. या आयडियाथॉन २०२५  साठी एकूण ३५० पेक्षा अधिक नाविन्यपूर्ण कल्पना प्राप्त झाल्या. त्यातील २३१ कल्पनांना दुसऱ्या फेरीसाठी निवडले गेले व या दुसऱ्या फेरीतून अंतिम फेरीसाठी फक्त ७१ कल्पना या निवडण्यात आल्या.

यावेळी  सुधीर आरळी, मुख्य कार्यकारी अधिकारी केआयटी आयआरएफ यांनी केआयटीच्या आज पर्यंतच्या कामांची व महत्त्वाच्या टप्प्यांची विस्तृत माहिती उपस्थितांना दिली. डॉ. मोहन वनरोट्टी, मुख्य अन्वेषक  DST NIDHI i-TBI & MSInS यांनी विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती निर्माण व्हावी, नवकल्पनांना प्रत्यक्षात आणण्यासाठी एक सकस व सुदृढ वातावरण निर्माण करून देण्यामध्ये केआयटी आयआरएफ सकारात्मक व यशस्वी प्रयत्न करत असल्याबाबत त्यांनी सांगितले.केआयटीच्या आयडिया लॅब मधील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्याच्या  माध्यमातून आपल्या कल्पनांना प्रोटोटाईप स्वरूपामध्ये आणण्यासाठी संशोधक तरुणाईने व नवउद्योकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी सर्वांना केले. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी श्री संजय रानडे रचना इलेक्ट्रिकल अँड रेफ्रिजरेशन्स सांगली, डॉ. शाम आडेपल्ली प्राध्यापक मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट यांची विशेष उपस्थिती होती.

या उपक्रमाचे आयोजन केआयटी आयआरएफ यांनी केले असून त्यांना महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी, कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय, महाराष्ट्र राज्य तसेच, केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, निधी आय-टीबीआय चे सहकार्य लाभले. डी-बाटू फोरम ऑफ इनोव्हेशन अँड इंक्युबॅशन अँड एंटरप्राइज, लोणेरे व उद्यम पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ फाउंडेशन इंक्युबॅशन सेंटर सोलापूर यांच्या विशेष सहकार्याने हा उपक्रम यशस्वीरित्या राबवण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक  समीर पुनस्कर, इंक्युबेशन मॅनेजर यांनी केले. ज्यामध्ये त्यांनी कार्यक्रमाचा हेतू,स्पर्धेचे नियम व अटी यांची सविस्तर माहिती दिली. स्पर्धकांकडून काय अपेक्षित आहे याची सुद्धा सविस्तर माहिती त्यांनी या प्रास्ताविकात दिली.त्यानंतर विविध क्षेत्रातील आठ तज्ञ परीक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत व परिचय करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष श्री साजिद हुदली , उपाध्यक्ष श्री सचिन मेनन, सचिव श्री दीपक चौगुले, यांनी आयडियाथॉन-२५ च्या यशस्वी नियोजन बद्दल केआयटी आयआरएफ च्या टीमचे अभिनंदन केले व प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋषिकेश दुधगावकर इंक्युबेशन असोसिएट यांनी केले.  पार्थ हजारे व  संदीप लाड यांनी या स्पर्धेची तांत्रिक बाजू यशस्वीरित्या सांभाळली. कार्यक्रमाचे आभार  देवेंद्र पाठक, इंक्युबेशन मॅनेजर यांनी मानले .

फोटो तपशिल-

१. केआयटी च्या वतीने आयोजित आयडियाथॉन-२५  स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी सादरीकरण करताना संशोधक विद्यार्थी.


२. केआयटी आयोजित ‘आयडियाथॉन-२५’ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेनिमित्त आमंत्रित केलेले उद्योजक श्री संजय रानडे यांचे स्वागत करताना संचालक डॉ.मोहन वनरोट्टी, डावीकडून श्री सुधीर आरळी.

३. केआयटी आयोजित ‘आयडियाथॉन-२५’ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेनिमित्त आमंत्रित केलेले विषय तज्ञ डॉ.श्याम आडेपल्ली यांचे स्वागत करताना संचालक डॉ.मोहन वनरोट्टी, डावीकडून श्री सुधीर आरळी

.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes