SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
मुस्लिम बांधवांची ईदुल-अजहा (बकर ईद) शनिवारी, नमाज वेळापत्रकसस्पेन्स थ्रीलर 'शातिर - द बिगिनिंग' येत्या 13 जून रोजी होणार प्रदर्शितकोल्हापुरात सोमवारी, मंगळवारी पाणी पुरवठा बंद; काळम्मावाडी पंपिंग स्टेशनची होणार दुरुस्तीपालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली महावितरणच्या वीज प्रश्नांवर सोमवारी जनता दरबार; तक्रार अर्ज दाखल करण्याचे आवाहनशिवराज्याभिषेक दिनानिमित्त 'आप'तर्फे रक्तदान शिबिर; 56 रक्तदात्यांनी केले रक्तदानशिवराज्याभिषेक दिनी शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारून शिवरायांना मानाचा मुजराशिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिनविकसित कृषी संकल्प अभियान अंतर्गत गडहिंग्लज तालुक्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन समृद्धी महामार्ग वाढवण बंदराशी जोडणार;हा महामार्ग राज्याच्या समृद्धीचा कॉरिडॉर ठरेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकोल्हापूर महापालिकेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण जनजागृती रॅली

जाहिरात

 

डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा

schedule05 Jun 25 person by visibility 131 categoryसामाजिक

कोल्हापूर  : डॉ. डी . वाय. पाटील हॉस्पीटल कदमवाडी येथे गुरुवारी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्याहस्ते वृक्षारोपण व रोपाला पाणी घालून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. 

  ५ जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा केला जातो. यंदा जागतिक पर्यावरण दिनानिमित्त  ‘प्लास्टिक प्रदुषणाचा अंत’ ही थीम निश्चित करण्यात आली होती.  यानिमित्त डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये प्लास्टिक विरोधी जनजागृती करून वृक्षारोपण करण्यात आले. 

डॉ. पाटील म्हणाले, पर्यावरण रक्षणामध्ये झाडांची भूमिका अतिशय महत्वाची आहे. सर्वानीच आपल्या घर किवा आजूबाजूच्या परिसरात किमान एक तरी झाड लावून ते जगवावे. निसर्गचक्र सुरळीत राखण्यासाठी झाडे लावणे व जगवणे महत्वाचे असल्याचे सांगितले. यावेळी सहाय्यक कुलसचिव अजित पाटील यांच्यासह गार्डन स्टाफ सुरज राणे, दीपक करपे, बाबासो रानगे, विष्णू पिंगळे यांच्यासह हॉस्पिटलचे कर्मचारी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes