SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
मुस्लिम बांधवांची ईदुल-अजहा (बकर ईद) शनिवारी, नमाज वेळापत्रकसस्पेन्स थ्रीलर 'शातिर - द बिगिनिंग' येत्या 13 जून रोजी होणार प्रदर्शितकोल्हापुरात सोमवारी, मंगळवारी पाणी पुरवठा बंद; काळम्मावाडी पंपिंग स्टेशनची होणार दुरुस्तीपालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली महावितरणच्या वीज प्रश्नांवर सोमवारी जनता दरबार; तक्रार अर्ज दाखल करण्याचे आवाहनशिवराज्याभिषेक दिनानिमित्त 'आप'तर्फे रक्तदान शिबिर; 56 रक्तदात्यांनी केले रक्तदानशिवराज्याभिषेक दिनी शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारून शिवरायांना मानाचा मुजराशिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिनविकसित कृषी संकल्प अभियान अंतर्गत गडहिंग्लज तालुक्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन समृद्धी महामार्ग वाढवण बंदराशी जोडणार;हा महामार्ग राज्याच्या समृद्धीचा कॉरिडॉर ठरेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकोल्हापूर महापालिकेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण जनजागृती रॅली

जाहिरात

 

शिवाजी विद्यापीठात पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण

schedule05 Jun 25 person by visibility 108 categoryसामाजिक

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात आज विविध अधिविभागांच्या परिसरात वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.

आज सकाळी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्या हस्ते पर्यावरण शास्त्र अधिविभागाच्या परिसरात विविध स्थानिक प्रजातींच्या रोपांची लागवड करण्यात आली.

 यावेळी अधिविभाग प्रमुख डॉ. आसावरी जाधव, यांच्यासह माजी विभागप्रमुख डॉ. प्रकाश राऊत, जैवरसायनशास्त्र अधिविभागाच्या डॉ. पद्मा दंडगे, उद्यान अधीक्षक अभिजीत जाधव यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, आजी व माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

त्याचप्रमाणे आज शिक्षणशास्त्र अधिविभागाच्या परिसरात आयुर्वेदिक व देशी प्रजातीची रोपे लावण्यात आली. माजी संशोधक विद्यार्थिनी डॉ. अफसाना मणेरी यांनी विभागास रोपे भेट दिली. आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार, डॉ. रुपाली संकपाळ, सरस्वती कांबळे, संगीता चंदनवाले, संजना भालकर, संगीता माने, संजय चव्हाण, अतुल जाधव यांनी वृक्षारोपण मोहिमेत सहभाग नोंदविला.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes