SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सस्पेन्स थ्रीलर 'शातिर - द बिगिनिंग' येत्या 13 जून रोजी होणार प्रदर्शितकोल्हापुरात सोमवारी, मंगळवारी पाणी पुरवठा बंद; काळम्मावाडी पंपिंग स्टेशनची होणार दुरुस्तीपालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली महावितरणच्या वीज प्रश्नांवर सोमवारी जनता दरबार; तक्रार अर्ज दाखल करण्याचे आवाहनशिवराज्याभिषेक दिनानिमित्त 'आप'तर्फे रक्तदान शिबिर; 56 रक्तदात्यांनी केले रक्तदानशिवराज्याभिषेक दिनी शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारून शिवरायांना मानाचा मुजराशिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिनविकसित कृषी संकल्प अभियान अंतर्गत गडहिंग्लज तालुक्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन समृद्धी महामार्ग वाढवण बंदराशी जोडणार;हा महामार्ग राज्याच्या समृद्धीचा कॉरिडॉर ठरेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकोल्हापूर महापालिकेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण जनजागृती रॅली जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने भाजपाच्या वतीने वृक्षारोपण आणि संवर्धन

जाहिरात

 

जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने भाजपाच्या वतीने वृक्षारोपण आणि संवर्धन

schedule05 Jun 25 person by visibility 147 categoryसामाजिक

कोल्हापूर : जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने शहरातील नऊ मंडलाच्या माध्यमातून वृक्षारोपण आणि वृक्ष संगोपन कार्यक्रम आज संपन्न झाला. पदाधिकाऱ्यांनी आपल्या परिसरात एकत्र येत वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेतले.

शेंडा पार्क परिसरात भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते एकत्र येत सर्वांनी श्रमदान करून  वृक्षारोपण करण्यात आले त्याचबरोबर लावलेल्या झाडांची देखभाल करत झाडांना सेंद्रिय खत देण्यात आले. 

याप्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष विजय जाधव म्हणाले, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा एक पेड माँ के नाम हा संकल्प आपण प्रत्येकाने आचरणात आणून आपापल्या परिसरात वृक्ष संवर्धनासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. त्याचबरोबर येणाऱ्या 2  महिन्यांच्या कालावधीत प्रत्येक मंडलात संकल्प से सिद्धी तक या कार्यक्रमा अंतर्गत वृक्ष लागवड संवर्धन कार्यक्रम प्रभावीपणे राबवणार असल्याचे नमूद केले

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष विजय जाधव, हेमंत आराध्ये, विशाल शिराळकर, गायत्री राऊत, अमर साठे, गणेश देसाई, किरण नकाते, माधुरी नकाते, मंगला निपाणीकर, गिरीश साळोखे, डॉ श्वेता गायकवाड, कोमल देसाई, धनश्री तोडकर, अमोल पालोजी, संजय जासूद, अमर साठे, धीरज पाटील, समीर यवळुजे, मानसिंग पाटील, दत्ता लोखंडे, बंकट सूर्यवंशी, प्रीतम यादव, जयराज निंबाळकर, सुधीर देसाई, फिरोज मुजावर, सयाजी आळवेकर, रविंद्र मुतगी, भरत काळे, कोगनुलकर, विनय खोपडे, नरेंद्र पाटील, प्रकाश घाटगे,दिग्विजय कालेकर, संग्राम जरग, सचिन पोवार, विश्वास पोवार, प्रग्नेश हमलई, किरण तासगावी, दिलीप बोंद्रे, गौरव सातपुते, प्रसाद पाटोळे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes