ईदनिमित्त कुर्बानीसाठी कत्तलखान्यात व्यवस्था
schedule05 Jun 25 person by visibility 151 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : महानगरपालिकेच्यावतीने शनिवारी होणाऱ्या बकरी ईद सणानिमित्त कुर्बानी विधीअंतर्गत कुर्बानी करण्यात येणाऱ्या जनावरांसाठी बापट कॅम्प व सदर बाजार येथील कत्तलखान्यात व्यवस्था केली आहे.
लहान जनावरे शेळी, मेंढी ही महापालिकेच्या बापट कॅम्प येथे तसेच मोठी जनावरांची सदर बाजार कत्तलखाना येथे कुर्बानीची व्यवस्था करण्यात आली आहे.
या व्यवस्थे व्यतिरिक्त इतरत्र कोठेही उघड्यावर लहान अथवा मोठ्या जनावरांची कुर्बानी करु नये. असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.