साई मंदिर परिवारातर्फे महिला आरोग्य सप्ताहाचे आयोजन
schedule23 Apr 25 person by visibility 253 categoryआरोग्य

* पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, शिवाजी पाटील यांचा होणार सत्कार
कोल्हापूर : रविवार पेठेतील साई मंदिराच्या वतीने विविध उपक्रमात वेळोवेळी हक्काने मदत करत असलेल्या पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके आणि आमदार शिवाजी पाटील यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा 25 एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता अक्कमादेवी मंडप बिंदू चौक येथे होणार आहे तसेच 26 एप्रिल ते ३ मे दरम्यान महिलांसाठी भव्य आरोग्य शिबिर सावित्रीबाई फुले येथे होणार आहे या दोन्ही कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आहवान साई मंदिर परिवाराच्या वतीने संयोजक समन्वयक डॉक्टर महेंद्र फाळके यांनी केली आहे .
येत्या शुक्रवारी 25 एप्रिल रोजी होणाऱ्या या सत्कार सोहळ्यास आंतरराष्ट्रीय किर्तीचे डॉक्टर सतीश पत्की .यांच्या सह आरोग्य उपसंचालक दिलीप माने यांच्यासह जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ . अनिरुद्ध पिंपळे ,.जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख ,कोल्हापूर महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रकाश पावरा आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत .
या कार्यक्रमावेळी उपस्थित राहून महिलांनी सावित्रीबाई फुले येथे होणाऱ्या आरोग्य शिबिरासाठी नाव नोंदणी करून टोकन क्रमांक घ्यावा , त्यामुळे गर्दी नियोजनासह अधिक सुसुत्रता येणार आहे .
सावित्रीबाई फुले हॉस्पीटल येथे पूर्ण सप्ताहामध्ये सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेत मोफत आरोग्य शिबीर संपन्न होणार आहे . यामध्ये तज्ञ डॉक्टरांच्या वतीने आरोग्य तपासणी उपचार सर्व तपासण्या मोफत तसेच औषध शस्त्रक्रियेही मोफत केल्या जाणार आहेत .
सिद्धगिरी जननीच्या डॉक्टर वर्षा पाटील तसेच कोल्हापूर कॅन्सर सेंटर च्या डॉक्टर रेश्मा पवार या सुद्धा या ठिकाणी तपासणीसह मार्गदर्शन करणार आहेत. या दोन्ही कार्यक्रमाचा लाभ कोल्हापूर पंचक्रोशीतील सर्वानी घ्यावा असे आहवान साई मंदिर परिवाराच्यावतीने डॉक्टर महेंद्र फाळके अणि संयोजक सहकारी यांनी केले आहे .