SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर : पर्ल हॉटेल समोरील अनधिकृत फुलवाले केबिनवर अतिक्रमण निर्मुलन पथकामार्फत कारवाईकोल्हापूरी गुळ जगभरात पोहोचण्यासाठी जीआय नोंदणी करा : डॉ. सुभाष घुलेकोल्हापूर येथे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा आढावा; राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिल्या महत्त्वपूर्ण सूचनाडॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला 'व्हेरी गुड' श्रेणीडी. वाय पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवणार : डॉ. संजय डी. पाटील; विद्यापीठाचा पाचवा स्थापना दिवस उत्साहात साजराडी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे ''राष्ट्रीय डॉक्टर डे' उत्साहात; कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्याकडून शुभेच्छाशक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या माथी मारु नका : सतेज पाटील विधानपरिषदेत कडाडले जिल्हाधिकारी लोकशाही दिन सोमवारी 7 जुलै रोजीविमा योजनेतील भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कधी कारवाई करणार ; सतेज पाटील यांचा सवाल : महिन्याच्या आत कारवाईचे कृषीमंत्र्यांचे आश्वासनशिवाजी विद्यापीठात वसंतराव नाईक जयंती उत्साहात

जाहिरात

 

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांच्या हस्ते डी. वाय. पाटील हॉस्पिटलचा सन्मान; मंत्री अनुप्रिया पटेल यांच्याहस्ते विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांनी स्वीकारला पुरस्कार

schedule14 Jun 25 person by visibility 432 categoryआरोग्य

कोल्हापूर  : लाखो रूग्णापर्यंत सवलतीच्या दरात आरोग्य सुविधा पुरविणाऱ्या आणि अत्याधुनिक उपचारांद्वारे आरोग्य सेवक लेखनीय योगदान देणाऱ्या कदमवाडी येथील डी. वाय. पाटील हॉस्पिटलचा ‘बेस्ट हॉस्पिटल विथ मेडिकल कॉलेज ऑफ द इयर’ म्हणून केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. डी. वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त पृथ्वीराज संजय पाटील यांनी केंदीय मंत्री  पटेल यांच्याहस्ते हा पुरस्कार स्वीकारला. माध्यम क्षेत्रातील अग्रगण्य ग्रुप "नवभारत"च्यावतीने हा पुरस्कार देण्यात आला.

  यावेळी ‘नवभारत’चे संचालक वैभव माहेश्वरी, रुबी क्लिनिकचे सीईओ बेहराम खुदाई आदी उपस्थित होते. मुंबईतील हॉटेल ताज प्रेसिडेंट येथे झालेल्या ८ व्या ‘हेल्थ केअर समिट’ मध्ये हा  पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कदमवाडी येथे २००३ मध्ये सुरू करण्यात आलेल्या डी वाय. पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या  माध्यमातून गेल्या २२ वर्षापासून लाखो रुग्णांना निरंतरपणे किफायतशीर दरात आरोग्यसेवा पुरविली जात आहे. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या  नेतृत्वाखाली हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या आजारावर उपचार सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर ग्रामीण भागातील लोकांसाठी मोफत आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे यांचे आयोजन केले जाते. 

कोरोना महासंकटात डॉ. संजय डी. पाटील यांनी संपूर्ण रुग्णालय कोरोना सेवेसाठी समर्पित केले होते. त्याचबरोबर गेल्या काही वर्षांपासून हॉस्पिटलमध्ये सर्व आजारावर मोफत तपासणी व उपचार सुविधा उपलब्ध केली आहे. सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सेवा, तपासण्या व उपचार हॉस्पिटल च्या माध्यमातून गरजू पर्यंत पोहचवण्यासाठी ते सतत प्रयत्नशील आहेत. या सर्व कार्याची दखल घेऊन हॉस्पिटलचा ‘बेस्ट हॉस्पीटल विथ मेडिकल कॉलेज ऑफ द इयर’ या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. 

हॉस्पीटलला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले,  अधिष्ठाता डॉ. राजेंद्र नेर्ली, उपअधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालाप्पा, आयक्यूएसी डायरेक्ट डॉ. शिंपा शर्मा,  वैद्यकीय अधीक्षिका डॉ. वैशाली गायकवाड, उपकुलसचिव संजय जाधव, सहाय्यक कुलसचिव अजित पाटील व मेडिकल कॉलेज हॉस्पिटलचे सर्व प्राध्यापक, डॉक्टर्स, परिचारिका, सहाय्यक, सर्व कर्मचारी, रुग्ण व नातेवाईक या सर्वांचे अभिनंदन केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes