SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
12 व 13 मार्च रोजी आयटीआयमध्ये प्लेसमेंट ड्राईव्ह; उमेदवारांना नोकरीची संधीनगररचना विभागामार्फत एक दिवसाचा विशेष कॅम्पगर्भाशय मुखाच्या कर्करोग प्रतिबंधासाठी महापालिकेची एचपीव्ही लसीकरण मोहीम सुरूपाणी पुरवठा विभागाच्यावतीने थकीत 27 कनेक्शन व 7 अनाधिकृत कनेक्शनवर कारवाईकोल्हापूर फर्स्टकडून महानगरपालिकेस सीएसआर निधीतून चार स्विपिंग मशिन्स थकबाकीदार व्यवसायिक मिळकती सील करा, इतर मिळकतींवर बोजा नोंद करा : आयुक्त के.मंजूलक्ष्मीमहिला दिनानिमित्त आयोजीत आरोग्य शिबीराचा 254 महिला कर्मचा-यांनी घेतला लाभखळबळजनक: शिवीगाळ केल्याचा राग मनात धरला अन् थेट दगडाने ठेचून काढला जीव! कोल्हापुरातील धक्कादायक प्रकार; २४ तासांत आरोपींना बेड्यामहिलांना संधीचा अभाव ही गंभीर सामाजिक समस्या: डॉ. जगन्नाथ पाटीलअकार्यक्षम व बेजबाबदार EESL कंपनीचा कोल्हापूर महानगरपालीके ‌सोबतचा पथ दिव्यांचा करार रद्द करा

जाहिरात

 

कोल्हापुरात हुल्लडबाज वाहनधारकांना रंगपंचमी महागात; वाहतूक पोलिसांकडून ३ लाख १७ हजारांचा दंड वसूल

schedule08 Mar 26 person by visibility 246 categoryगुन्हे

कोल्हापूर शहरात रंगपंचमीचा उत्साह सुरू असतानाच नियमांचे उल्लंघन करून हुल्लडबाजी करणाऱ्या वाहनधारकांवर शहर वाहतूक नियंत्रण शाखेने कारवाईचा बडगा उगारला आहे. रविवार, ८ मार्च २०२६ रोजी सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत राबवण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत एकूण ३७० वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून ३ लाख १७ हजार १०० रुपयांचा तडजोड शुल्क आकारण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेच्या विविध पथकांनी शहरातील मुख्य चौकांमध्ये फिक्स पॉईंट आणि पेट्रोलिंगद्वारे ही मोहीम राबवली. यामध्ये प्रामुख्याने ट्रिपल सीट वाहन चालवणे, परवाना जवळ न बाळगणे आणि नो-एंट्रीमध्ये वाहन घुसवणे अशा प्रकारच्या गुन्ह्यांची सर्वाधिक नोंद झाली आहे.


वाहतूक पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, सर्वाधिक कारवाई ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या १४० वाहनधारकांवर करण्यात आली असून, त्यांच्याकडून १ लाख ४० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. त्याखालोखाल परवाना नसलेल्या ७८ जणांवर ५८ हजार रुपयांची कारवाई झाली आहे. तसेच वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणाऱ्या २८ जणांकडून २९ हजार रुपये, तर विहित नमुन्यात नंबर प्लेट नसलेल्या २४ जणांवर १९ हजार रुपयांचा दंड आकारला आहे. याशिवाय मद्यप्राशन करून वाहन चालवणे, प्रवेश बंद मार्गातून प्रवास करणे आणि कर्कश हॉर्न वाजवणे अशा एकूण ३७० केसेसची नोंद एकाच दिवसात झाली आहे. पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्या नेतृत्वाखाली सपोनि जाधव, सपोनि मात्रे आणि इतर पोलीस अंमलदारांनी ही यशस्वी कारवाई केली. सण-उत्सवाच्या काळात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी ही कडक पावले उचलण्यात आली आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes