SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आरोग्य विभागाच्या सर्व्हेक्षणामध्ये 31 घरांमध्ये डेंग्यु आढळलेकोल्हापूर : पर्ल हॉटेल समोरील अनधिकृत फुलवाले केबिनवर अतिक्रमण निर्मुलन पथकामार्फत कारवाईकोल्हापूरी गुळ जगभरात पोहोचण्यासाठी जीआय नोंदणी करा : डॉ. सुभाष घुलेकोल्हापूर येथे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा आढावा; राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिल्या महत्त्वपूर्ण सूचनाडॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला 'व्हेरी गुड' श्रेणीडी. वाय पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवणार : डॉ. संजय डी. पाटील; विद्यापीठाचा पाचवा स्थापना दिवस उत्साहात साजराडी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे ''राष्ट्रीय डॉक्टर डे' उत्साहात; कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्याकडून शुभेच्छाशक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या माथी मारु नका : सतेज पाटील विधानपरिषदेत कडाडले जिल्हाधिकारी लोकशाही दिन सोमवारी 7 जुलै रोजीविमा योजनेतील भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कधी कारवाई करणार ; सतेज पाटील यांचा सवाल : महिन्याच्या आत कारवाईचे कृषीमंत्र्यांचे आश्वासन

जाहिरात

 

मिरज येथे भरदिवसा गोळीबार करुन फरारी झालेला आरोपी व त्याचे पाच साथीदार जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाची कारवाई

schedule26 Jun 25 person by visibility 311 categoryगुन्हे

कोल्हापूर  : मिरज येथे भरदिवसा गोळीबार करुन फरारी झालेला आरोपी व त्याचे पाच साथीदारांना अग्नीशस्त्र, जिवंत राऊंड व सुरा अशा हत्यारासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले.

 पोलीस अधीक्षक योगेश कुमार  यांनी काल दिनांक २५/०६/२०२५ रोजी रात्रौ २३.००वा ते दिनांक २६/०६/२०२५ रोजी ०२.००वा या कालावधीमध्ये जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना नाकाबंदी व कोंबिंग ऑपरेशन करुन गुन्हेगारांना चेक करणेबाबत सुचना दिलेल्या होत्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक  रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील दोन अधिकारी व १५ पोलीस अमंलदार यांचे पथक नेमले होते.

सदरचे पथक हे फरारी पाहिजे असलेले आरोपी तसेच हद्दपार असलेले आरोपीचा शोध घेत असताना पथकातील पोलीस अमंलदार वैभव पाटील यांना त्यांचे गोपनीय बातमीदार यांचेकडुन बातमी मिळाली की, मिरज शहर पोलीस ठाणे येथे अग्निशस्त्राने भर दिवसा फायरींग करून खुनाचा प्रयत्न केलेला व यापुर्वीही त्याने त्याचे साथीदारांसह गंभीर स्वरूपाचे गुन्हे केलेला आरोपी सुरज कोरे हा व त्याचे अन्य साथीदार यांचेसह तो शिरोली एमआयडीसी येथील हॉटेल रसिका येथे आपले अस्तीत्व लपवुन थांबलेला असल्याची माहिती मिळाली. पथकाने त्याचेबाबत अधिक माहिती घेतली असता सुरज चंदु कोरे याचे विरुध्द मिरज शहर पोलीस ठाणेस गुन्हा रजि न. २४२/२०२५ भा न्या स कलम १०९,३ (५), भारतीय हत्यार कायदा कलम ३,४ (२५) सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ प्रमाणे दिनांक १८/०६/२०२५ रोजी दाखल असल्याची खात्री झाली.

 पथकाने पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांचे मार्गर्शनाप्रमाणे योग्य प्रकारे छापा कारवाईचे नियोजन व आखणी करून केली. सदर आरोपीकडे अग्नीशस्त्र असल्याची माहिती मिळाल्याने जाणा-या पथकावर हल्ला होवु शकतो, याची पथकाने योग्य ती दक्षता घेवुन व तशी सुरक्षेची पुर्ण तयारी करुन एमआयडीसी शिरोली येथील हॉटेल रसीका क्लासीक या हॉटेलमध्ये रुम न. ३०१ येथे छापा टाकला असता ०६ इसम मिळुन आले. त्यांना त्यांची नावे विचारली असता त्यांनी त्यांची नावे १) सुरज चंदु कोरे व.व. २५, रा. ढेरे गल्ली, मिरज, जि. सांगली २) प्रथमेश सुरेश ढेरे व.व. २५, रा. ढेरे गल्ली, मंगळवार पेठ, मिरज, जि. सांगली, ३) विशाल बाजीराव शिरोळे व.व. २४, रा. मंगळवारपेठ, मिरज, जि. सांगली, ४) पवनसिंग संजयसिंग राजपूत व.व. २७, रा. मंगळवारपेठ, मिरज, जि. सांगली, ५) सरफराज बाळासो सय्यद व.व. २३, रा. मंगळवारपेठ, मिरज, जि. सांगली, ६) आफताब आयुब गाझी व.व. २४, रा. मंगळवारपेठ, मिरज, जि. सांगली अशी सांगितली.

 त्यांची दोन पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्यांचे कब्जातुन खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वरील प्रमाणे आरोपींचे कब्जातुन एकुण २२,२१,५००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच नमुद आरोपी हे हत्यारासह मिळुन आलेने त्यांचे विरुध्द शिरोली एमआयडीसी पोलीस ठाणे येथे शस्त्र अधिनियमा अंतर्गत गुन्हा दाखल करुन कायदेशिर कारवाई केलेली आहे.

आरोपी १) सुरज चंदु कोरे व.व. २५, रा. ढेरे गल्ली, मिरज, जि. सांगली २) प्रथमेश सुरेश ढेरे व.व. २५, रा. ढेरे गल्ली, मंगळवार पेठ, मिरज, जि. सांगली, ३) विशाल बाजीराव शिरोळे व.व. २४, रा. मंगळवारपेठ, मिरज, जि. सांगली, ४) पवनसिंग संजयसिंग राजपूत व.व. २७, रा. मंगळवारपेठ, मिरज, जि. सांगली, ५) सरफराज बाळासो सय्यद व.व. २३, रा. मंगळवारपेठ, मिरज, जि. सांगली यांचे विरुध्द यापुर्वीही शरीराविरुध्दचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळुन आलेली आहे. तसेच आरोपी नामे सुरज चंदु कोरे याचेविरूध्द मिरज शहर पोलीस ठाणे येथे दिनांक १८/०६/२०२५ रोजी फायरिंगचा गुन्हा दाखल असुन गुन्हा दाखल झालेपासुन तो फरार होता. सर्व आरोपीना पुढील कायदेशीर कारवाईकरीता शिरोली एमआयडीसी पोलीस ठाणेच्या ताब्यात दिलेले आहे.

ही कारवाई  पोलीस अधीक्षक  योगेश कुमार साो यांचे मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक, संतोष गळवे, शेष मोरे, वैभव पाटील, विलास किरोळकर, अमित मर्दाने, अनिकेत मोरे, सत्यजित तानुगडे यांनी केलेली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes