तात्यासाहेब कोरे डिप्लोमा कॉलेज, वारणानगर विद्यार्थ्यांची निकालाची यशस्वी परंपरा कायम
schedule30 Jun 25 person by visibility 228 categoryशैक्षणिक

वारणानगर : उन्हाळी २०२५ परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, सर्व विभागांमध्ये विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे. महाविद्यालयाच्या चारही विभागांतील प्रथम, व्दितीय व तृतीय वर्षात उत्तम गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपापल्या गुणवत्तेचा ठसा उमटवला आहे.
या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे श्री वारणा विविध उद्योग व शिक्षण समुहाचे अध्यक्ष आ. डॉ. विनय कोरे व श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.व्ही.व्ही.कार्जीनी यांचे वेळोवेळी लाभलेले मोलाचे मार्गदर्शन व प्रेरणा कारणीभूत ठरले आहे.
महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी गणित विषयात उत्कृष्ट गुण मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे: यश महादेव अंबिरकर – १००/१०० (इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग – प्रथम वर्ष),प्राची प्रकाश शिंदे – १००/१०० (कॉम्प्युटर सायन्स – प्रथम वर्ष),वैष्णवी विजय मोरे – ९७/१०० (मेकॅनिकल इंजिनीअरिंग – प्रथम वर्ष)
महाविद्यालयाच्या चारही विभागांतील प्रथम, व्दितीय व तृतीय वर्षात प्रथम स्थान पटकावणारे विद्यार्थी:
कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग विभाग: प्रथम वर्ष: शिंदे प्राची प्रकाश – ९०.००%,व्दितीय वर्ष: पाटील प्रतीक युवराज – ८८.२२%,तृतीय वर्ष: मोहिते संजय दगडू – ८८.६९%
इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग विभाग : प्रथम वर्ष: यश महादेव अबिरकर – ८३.८८%,व्दितीयवर्ष: पूजा चंद्रकांत साळुंखे – ७६.७६%,तृतीय वर्ष: योगिता दीपक जाधव – ८७.१७%
मेकॅनिकल इंजिनीअरिंग विभाग : प्रथम वर्ष: मोरे वैश्णवी विजय – ८७.८८%,व्दितीय वर्ष: सुतार शिवम दिनेश – ७९.११%,तृतीय वर्ष: घाटगे दर्शन रवींद्र – ७९.५९%
सिव्हिल इंजिनीअरिंग विभाग:प्रथम वर्ष: साळुंखे सुयोग जयसिंग – ८२.८५%, व्दितीय वर्ष: पाटील तन्वी दत्तात्रय – ८८.०८%, तृतीय वर्ष: माळी अनुराधा सुनील – ८७.५८%
श्री वारणा विविध उद्योग व शिक्षण समुहाचे अध्यक्ष आ. डॉ.विनय कोरे, श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.व्ही. व्ही. कार्जीनी, प्राचार्य पी.आर.पाटील ,मार्गदर्शक डॉ. पी. एम. पाटील,विविध विभागाचे विभाग प्रमुख व शिक्षक यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अभ्यास, शिस्त आणि मेहनतीच्या जोरावर विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश महाविद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता अधोरेखित करते.