केईएम रुग्णालयात अत्याधुनिक ‘व्हेसल सीलर’ उपकरणे उपलब्ध; गरीब रुग्णांना मोठा दिलासा
schedule24 May 26 person by visibility 144 categoryराज्य
मुंबई : मुंबईतील सेठ जी. एस. मेडिकल कॉलेज आणि केईएम रुग्णालयात गरीब व गरजू रुग्णांसाठी अत्याधुनिक ‘हाय-एंड व्हेसल सीलर’ (Vessel Sealer) उपकरणे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. इंडियन ऑइल कंपनीच्या सीएसआर (CSR) सहकार्यातून ही दोन प्रगत इलेक्ट्रोसर्जिकल युनिट्स जनरल सर्जरी विभागाच्या ‘इलेक्टिव्ह सर्जरी ओटी’ जमेशदजी मेहता शस्त्रक्रिया कक्षामध्ये बसविण्यात आली आहेत.
हे अत्याधुनिक उपकरण शस्त्रक्रियेदरम्यान रक्तवाहिन्या सील करून रक्तस्राव त्वरित थांबवण्यास अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. यामुळे जटिल शस्त्रक्रियांची अचूकता वाढणार असून, शस्त्रक्रियेतील गुंतागुंत कमी होईल आणि रुग्णांची सुरक्षितता वाढेल. राज्यातील प्रत्येक नागरिकाला गुणवत्तापूर्ण आणि अत्याधुनिक आरोग्य सेवा देणे ही सरकारची प्राथमिकता असून, अशा उपक्रमांमुळे सार्वजनिक रुग्णालयांची क्षमता वाढून गरीब व वंचित घटकांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
तसेच त्यांनी या मदतीबद्दल इंडियन ऑइल कंपनीचे आभार मानले.