SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आरोग्य विभागाच्या सर्व्हेक्षणामध्ये 31 घरांमध्ये डेंग्यु आढळलेकोल्हापूर : पर्ल हॉटेल समोरील अनधिकृत फुलवाले केबिनवर अतिक्रमण निर्मुलन पथकामार्फत कारवाईकोल्हापूरी गुळ जगभरात पोहोचण्यासाठी जीआय नोंदणी करा : डॉ. सुभाष घुलेकोल्हापूर येथे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा आढावा; राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिल्या महत्त्वपूर्ण सूचनाडॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला 'व्हेरी गुड' श्रेणीडी. वाय पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवणार : डॉ. संजय डी. पाटील; विद्यापीठाचा पाचवा स्थापना दिवस उत्साहात साजराडी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे ''राष्ट्रीय डॉक्टर डे' उत्साहात; कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्याकडून शुभेच्छाशक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या माथी मारु नका : सतेज पाटील विधानपरिषदेत कडाडले जिल्हाधिकारी लोकशाही दिन सोमवारी 7 जुलै रोजीविमा योजनेतील भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कधी कारवाई करणार ; सतेज पाटील यांचा सवाल : महिन्याच्या आत कारवाईचे कृषीमंत्र्यांचे आश्वासन

जाहिरात

 

सर्वेश पोतदार बुद्धिबळ स्पर्धेत अजिंक्य

schedule23 Jun 25 person by visibility 216 categoryक्रीडा

कोल्हापूर :   अनुज् चेस ॲकॅडमीच्यावतीने दि 22 जून रोजी डॉ डी वाय पाटील विद्यानिकेतन स्कूल व इंजिनिअरींग काॅलेज साळोखेनगर येथे घेण्यात आलेल्या शालेय 16 वर्षाखालील बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन डॉ अंकुश बनसोडे व समृद्धी मुळे यांचे हस्ते पटावरील चाल करून करण्यात आले. स्पर्धेमध्ये 6 फेऱ्या घेण्यात आल्या. सर्वेश पोतदार याने 5.5 गुण मिळवून अजिंक्यपद पटकाविले. अर्णव ऱ्हाटवळ  याने 5.5 (प्रोग्रेसिव) गुण मिळवून उपविजेतेपद पटकाविले.  

▪️स्पर्धेतील इतर विजेते पुढील प्रमाणे 
तृतीय क्रमांक प्रणव मोरे 5.5 गुण 
चौथा क्रमांक राधेश्वर ठोंबरे 5 गुण 
पाचवा क्रमांक वंशील ठक्कर 5 गुण 

▪️16 वर्षाखालील इतर विजेते 
▪️8 वर्षाखालील
प्रथम क्रमांक सौमित्र जोशी 4 गुण
द्वितीय क्रमांक अनुप कानडे 3 गुण

▪️10 वर्षाखालील
प्रथम क्रमांक अवनीश जितकर 4.5 गुण
द्वितीय क्रमांक श्रीतेज वाली 3.5 गुण

▪️12 वर्षाखालील
प्रथम क्रमांक श्रीयांश हराडे 5 गुण
द्वितीय क्रमांक आरोही बनसोडे 4 गुण 

▪️14 वर्षाखालील
प्रथम क्रमांक अच्युत दावणे 5 गुण
द्वितीय क्रमांक ओजस व्हनमाने 5 गुण

▪️अनुज् चेस अकॅडमी विजेते
प्रथम क्रमांक अभिनंदन पाटील 4 गुण
द्वितीय क्रमांक पृथ्वीराज गुरव 4 गुण
तृतीय क्रमांक अद्विक विचारे 4 गुण
चौथा क्रमांक  स्वरूप चौगले 4 गुण
पाचवा क्रमांक आयुष्मान राणा 4 गुण
उत्तेजनार्थ बक्षीस - अथर्व कुंभार 

स्पर्धेमध्ये एकूण 80 स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेसाठी पंच म्हणून  बाबूराव पाटील यांनी काम पाहिले. बक्षीस वितरण सुधीर जितकर, उमेश कांबळे, राष्ट्रीय बुद्धिबळ खेळाडू, बुद्धिबळ प्रशिक्षक पंच अनुष्का पाटील तसेच कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे माजी सचिव  कृष्णात पाटील, आदी मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आमदार सतेज पाटील, माजी आमदार ऋतुराज  पाटील व डॉ डी वाय पाटील इंजिनिअरींग काॅलेज साळोखेनगर चे प्रिंसीपल डॉ सुरेश माने यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच शशिकांत कबनूरकर, अनुराग पाटील यांनी परिश्रम घेतले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes