SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शिवाजी विद्यापीठात उद्यापासून जागतिक पर्यावरण अभियानराज्यसभा पोटनिवडणुकीसाठी १८ जूनला मतदानउत्पादन आणि लॉजिस्टिक्सच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकेईएम रुग्णालयात अत्याधुनिक ‘व्हेसल सीलर’ उपकरणे उपलब्ध; गरीब रुग्णांना मोठा दिलासा'स्वर्गीय आमदार पी. एन. पाटील म्हणजे तळागाळातील कार्यकर्त्यांचा आधारवड'चालुक्याज् क्रीडा महोत्सव २०२६: जिमनास्टिक्स व बास्केटबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न; पुणे आणि साताऱ्याची बाजीकागलमध्ये राजमाता जिजाऊ बसचे स्वागत; मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बसचे पूजनबंधुत्वाचा अनोखा उत्सव: नॅशनल ब्रदर्स डेमतदार याद्यांच्या अचूकतेसाठी २० जूनपासून 'विशेष सखोल पुनरीक्षण' मोहीमअनुष्का जमदाडे व हर्षला पाटील यांची राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड

जाहिरात

 

कागलमध्ये राजमाता जिजाऊ बसचे स्वागत; मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बसचे पूजन

schedule24 May 26 person by visibility 208 categoryराज्य

▪️प्रवाशांचा प्रवास होणार आरामदायी व सुखकर
        
कागल : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कागल आगारामध्ये नव्यानेच "राजमाता जिजाऊ बस" दाखल झाल्या. एकूण ५६ आसन क्षमता असलेल्या या अद्यावत बसचे पूजन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील पहिल्या दोन बसेस कागल आगारामध्ये दाखल झाल्या. 
           
यावेळी बोलताना मंत्री  मुश्रीफ म्हणाले, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून सुरू केलेली "राजमाता जिजाऊ बससेवा" ही एक अत्याधुनिक व स्मार्ट अशी बससेवा आहे. या बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा सुविधा व आरामदायी आसनांची रचना करण्यात आलेली आहे. सहाजिकच प्रवाशांचा प्रवास सुखकर व आरामदायी होणार आहे.   
          
यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्यासाहेब माने, माजी नगराध्यक्ष अस्लम मुजावर, माजी उपनगराध्यक्ष सुनील माळी, नवाज मुश्रीफ, कागल एस. टी. बस स्थानकाचे मॅनेजर संदीप पाटील, मारुती जोशी, अरुण लाड व एस. टी .कामगार संघटनेचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes