SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आरोग्य विभागाच्या सर्व्हेक्षणामध्ये 31 घरांमध्ये डेंग्यु आढळलेकोल्हापूर : पर्ल हॉटेल समोरील अनधिकृत फुलवाले केबिनवर अतिक्रमण निर्मुलन पथकामार्फत कारवाईकोल्हापूरी गुळ जगभरात पोहोचण्यासाठी जीआय नोंदणी करा : डॉ. सुभाष घुलेकोल्हापूर येथे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा आढावा; राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिल्या महत्त्वपूर्ण सूचनाडॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला 'व्हेरी गुड' श्रेणीडी. वाय पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवणार : डॉ. संजय डी. पाटील; विद्यापीठाचा पाचवा स्थापना दिवस उत्साहात साजराडी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे ''राष्ट्रीय डॉक्टर डे' उत्साहात; कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्याकडून शुभेच्छाशक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या माथी मारु नका : सतेज पाटील विधानपरिषदेत कडाडले जिल्हाधिकारी लोकशाही दिन सोमवारी 7 जुलै रोजीविमा योजनेतील भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कधी कारवाई करणार ; सतेज पाटील यांचा सवाल : महिन्याच्या आत कारवाईचे कृषीमंत्र्यांचे आश्वासन

जाहिरात

 

कोल्हापूर : संभाजीनगर येथील कामगार चाळ ब मधील धोकादायक इमारतीचा काही भाग कोसळला; इमारत कमकुवत; कुटुंबांनी स्थलांतरीत होण्याचे प्रशासनाचे आवाहन

schedule24 Jun 25 person by visibility 357 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर  : छत्रपती संभाजीनगर कामगार चाळ मध्ये महापालिकेचे सर्व कामगार व त्यांचे कुटुंब राहते. मंगळवारी छत्रपती संभाजीनगर येथील कामगार चाळ ब मधील धोकादायक इमारतीचा काही भाग कोसळला. याची माहिती प्रशासनास मिळताच प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या सूचनेनुसार तातडीने सकाळी अति.आयुक्त राहुल रोकडे, सहा.आयुक्त स्वाती दुधाने, शहर अभियंता हर्षजीत घाटगे, उपशहर अभियंता महादेव फुलारी, स्ट्रॅक्चरलर ऑडीटर प्रशांत हडकर, इस्टेट ऑफिसर विलास साळोखे व अन्य कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन जागेवर पाहणी केली.

  या ठिकाणी 5 धोकादायक इमारती व 2 बैठ्या इमारती असून येथे 37 कुटुंबे राहतात. सन 2014 पासून या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या कामगारांना दरवर्षी नोटीसा दिल्या आहेत. परंतु तरी देखील या इमारती कामगारांनी रिकाम्या केल्या नाहीत. या ठिकाणी आज सकाळी अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे यांनी कामगारांच्या प्रतिनिधींशी व कर्मचा-यांशी समक्ष चर्चा केली. या चर्चेमध्ये सदरची इमारत कमकुवत झाली असल्याने येथे राहणे धोक्याचे असल्याचे सांगण्यात आले. या इमारतीत जीवीतास धोका असून आपण कोणतीही दुघर्टना घडण्या अगोदर या इमारती खाली कराव्यात असे आवाहन त्यांनी केले.

 त्याचबरोबर महापालिकेच्यावतीने कामगारांचे मासिक वेतनातून घरभाडे पोटी होणारी कपात  या खोल्या रिकाम्या केलेवर लगेच थोपविण्यात येणार असलेची हमी देण्यात आली. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेमधून किंवा अन्य शासनाच्या योजनेतून या ठिकाणी नविन इमारत बांधणे बाबत दोन दिवसामध्ये डि.पी.आर सादर करणे बाबत शहर अभियंतांना सुचना देण्यात आल्या. सद्या प्रत्यक्ष वास्तव्यास असणाऱ्या कामगारांनी खोल्या खाली करुन रितसर लेखी अर्ज इस्टेट विभागाकडे देण्यात यावा अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes