SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शिवाजी विद्यापीठात उद्यापासून जागतिक पर्यावरण अभियानराज्यसभा पोटनिवडणुकीसाठी १८ जूनला मतदानउत्पादन आणि लॉजिस्टिक्सच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकेईएम रुग्णालयात अत्याधुनिक ‘व्हेसल सीलर’ उपकरणे उपलब्ध; गरीब रुग्णांना मोठा दिलासा'स्वर्गीय आमदार पी. एन. पाटील म्हणजे तळागाळातील कार्यकर्त्यांचा आधारवड'चालुक्याज् क्रीडा महोत्सव २०२६: जिमनास्टिक्स व बास्केटबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न; पुणे आणि साताऱ्याची बाजीकागलमध्ये राजमाता जिजाऊ बसचे स्वागत; मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बसचे पूजनबंधुत्वाचा अनोखा उत्सव: नॅशनल ब्रदर्स डेमतदार याद्यांच्या अचूकतेसाठी २० जूनपासून 'विशेष सखोल पुनरीक्षण' मोहीमअनुष्का जमदाडे व हर्षला पाटील यांची राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड

जाहिरात

 

'स्वर्गीय आमदार पी. एन. पाटील म्हणजे तळागाळातील कार्यकर्त्यांचा आधारवड'

schedule24 May 26 person by visibility 137 categoryसामाजिक

▪️मंत्री हसन मुश्रीफ यांनी दुसऱ्या पुण्यतिथीनिमित्त केले अभिवादन
           
फुलेवाडी : स्व. आमदार पी. एन. पाटील हे तळागाळातील कार्यकर्त्यांचे आधारवड होते. राजकीय, शैक्षणिक सामाजिक कार्यात त्यांचा मोठा पुढाकार होता. त्यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही, असे प्रतिपादन मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते असूनदेखील त्यांनी कार्यकर्त्यांच्या बाबतीत कोणताही पक्षीय भेदभाव केला नव्हता. नेहमीच ते सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत होते, असेही त्यांनी सांगितले.
          
काँग्रेसचे कोल्हापुरातील ज्येष्ठ नेते स्वर्गीय आमदार पी. एन. पाटील यांच्या द्वितीय पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन मंत्री  मुश्रीफ व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
           
▪️सहकार व शेतकऱ्यांवर प्रेम.....!
मंत्री  मुश्रीफ म्हणाले, स्वर्गीय आमदार पी. एन. पाटील यांचे सहकार, शेतकऱ्यांवर आणि कार्यकर्त्यांवर विशेष प्रेम होते. सहकार, राजकारण आणि समाजकारणामध्ये त्यांची उणीव सततच भासत राहील.
          
याप्रसंगी खासदार छत्रपती शाहू महाराज, शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे, माजी आमदार के.  पी. पाटील, गोकुळचे माजी अध्यक्ष अरुणराव डोंगळे, नाना कदम, गोकुळचे संचालक युवराज पाटील, बाळासाहेब खाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर, ए. वाय. पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य राजू सूर्यवंशी, भोगावती कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वासराव पाटील, बाजार समितीचे संचालक भारत पाटील-भुयेकर, संभाजी पाटील, माजी सभापती पांडुरंग पाटील, शंकरराव पाटील, बी. एच. पाटील, भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दिगंबर मेडसिंगे, पंचायत समितीचे सभापती साताप्पा पाटील, हंबीरराव वळके, शिवाजी आडनाईक, सत्यजित पाटील, भोगावती कारखान्याचे सर्व संचालक व मतदारसंघातील सर्व पदाधिकारी, महिला व नागरिक उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes