SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जागतिक युवा कौशल्य दिन: भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी तरुणांचे सक्षमीकरणगौण खनिज उत्खनन नियमात सुधारणा करण्यास मान्यताशिवाजी विद्यापीठाचा इन्फ्राप्लान समुहासमवेत सामंजस्य करार; जलविद्याविषयक संशोधनाला गती मिळणारराष्ट्र सेवा दलाचे माजी अध्यक्ष भरत लाटकर यांचे निधनउपकुलसचिव निवास माने यांना पीएच.डी.अंबाबाई मंदिराचे जतन-संवर्धन योग्य मार्गावर: पुरातत्त्व विभागाने स्पष्ट केले पाणीगळतीचे कारण!ऑनलाईन सेवांचा विस्तार करा; नागरिकांना घरी बसूनच सेवा मिळाल्या पाहिजेत : राज्य आयुक्त सुधाकर तेलंगपंजाबमध्ये भाजपची घोडदौड: जनसंपर्क मोहिमेद्वारे पक्ष बळकटीकरणावर भर!फिफा वर्ल्ड कप २०२६: फ्रान्स विरुद्ध स्पेन - महासंग्रामाची रंगत!विद्यार्थ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी अभाविप आक्रमक; विविध मंत्र्यांची भेट घेऊन केली मागण्यांची जोरदार मांडणी

जाहिरात

 

प्रा. एन. डी. पाटील यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठात १५ जुलैला व्याख्यान

schedule13 Jul 26 person by visibility 180 categoryसामाजिक

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. एन. डी. पाटील लोकचळवळ अध्यासनाच्या वतीने प्रा. एन. डी. पाटील यांच्या जयंतीनिमित्त "प्रा. एन. डी. पाटील आणि सामाजिक चळवळी" या विषयावरील विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या बुधवारी (दि. १५) सकाळी ११.३० वाजता विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात व्याख्यान होईल.

ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ (सातारा) हे प्रमुख वक्ते आहेत, तर यावेळी सुप्रसिद्ध शाहिर रंगराव पाटील (कोल्हापूर) यांचे शाहीरी सादरीकरण होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव असतील.

कार्यक्रमास डॉ. सरोज (माई) पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या व्याख्यानाला विद्यार्थी, संशोधक, शिक्षक तसेच सामाजिक चळवळींमध्ये कार्यरत असलेल्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. एन. डी. पाटील लोकचळवळ अध्यासनाचे समन्वयक प्रा. (डॉ.) रणधीर शिंदे आणि डॉ. नंदकुमार मोरे यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes