SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आरोग्य विभागाच्या सर्व्हेक्षणामध्ये 31 घरांमध्ये डेंग्यु आढळलेकोल्हापूर : पर्ल हॉटेल समोरील अनधिकृत फुलवाले केबिनवर अतिक्रमण निर्मुलन पथकामार्फत कारवाईकोल्हापूरी गुळ जगभरात पोहोचण्यासाठी जीआय नोंदणी करा : डॉ. सुभाष घुलेकोल्हापूर येथे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा आढावा; राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिल्या महत्त्वपूर्ण सूचनाडॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला 'व्हेरी गुड' श्रेणीडी. वाय पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवणार : डॉ. संजय डी. पाटील; विद्यापीठाचा पाचवा स्थापना दिवस उत्साहात साजराडी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे ''राष्ट्रीय डॉक्टर डे' उत्साहात; कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्याकडून शुभेच्छाशक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या माथी मारु नका : सतेज पाटील विधानपरिषदेत कडाडले जिल्हाधिकारी लोकशाही दिन सोमवारी 7 जुलै रोजीविमा योजनेतील भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कधी कारवाई करणार ; सतेज पाटील यांचा सवाल : महिन्याच्या आत कारवाईचे कृषीमंत्र्यांचे आश्वासन

जाहिरात

 

नवी दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय ग्रँड मास्टर बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूरच्या ऋषिकेश कबनूरकरचे यश

schedule10 Jun 25 person by visibility 550 categoryक्रीडा

कोल्हापूर :  नवी दिल्ली येथे 7 ते 10 जून  दरम्यान दिल्ली बुद्धिबळ असोसिएशन आयोजित आंतरराष्ट्रीय ग्रँड मास्टर  २००० फिडे रेटिंग खालील बी कॅटेगरी बुद्धिबळ स्पर्धेत ऋषिकेश कबनूरकर १० फेरीत ८ गुण मिळवून संयुक्त तिसरा क्रमांक मिळवला आणि क्रमवारीत १० नंबर मिळवला त्याला ६०००० रुपये आणि  पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तर तेलंगणा राज्यातील सार्थक अदबतला  या स्पर्धेचा   विजेता ठरला. त्याला  चार लाख रुपये बक्षीस घेऊन त्याला गौरवण्यात आले.
 या स्पर्धेला तब्बल ८५८ खेळाडूंनी भाग घेतलेला त्यामध्ये आंतरराष्ट्रीय मानांकित ७३९ खेळाडू होते.  ऋषिकेश ची  बहीण शर्वरी कबनूरकर हिने  पाच गुण मिळवले. या बी कॅटेगरीच्या स्पर्धेला एकूण 35 लाख रुपये बक्षीस होते .

या स्पर्धेत  तीन कॅटेगरीमध्ये  स्पर्धा खेळण्यात आली. एक ग्रँड मास्टर एक कॅटेगरी 2000 रेटिंग च्या खालील,  बी कॅटेगरी आणि 1700 रेटिंग च्या खाली अशा तीन कॅटेगिरी मध्ये ही स्पर्धा खेळण्यात आली. या स्पर्धेला एकूण बक्षीस एक कोटी २१ लाख रुपये रकमेची होती. 

ऋषिकेश हा विवेकानंद महाविद्यालयाचा विद्यार्थी  त्यास श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिव प्राचार्या शुभांगी गावडे , संस्थेचे सी.ई.ओ. कौस्तुभ गावडे  यांचे प्रोत्साहन लाभले.


तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विकास जाधव, ज्युनिअर जिमखाना विभाग प्रमुख प्रा. संतोष कुंडले, प्रा. समीर पठाण, प्रा. प्रशांत कांबळे, बुद्धिबळ प्रशिक्षक कृष्णात पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes