SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आरोग्य विभागाच्या सर्व्हेक्षणामध्ये 31 घरांमध्ये डेंग्यु आढळलेकोल्हापूर : पर्ल हॉटेल समोरील अनधिकृत फुलवाले केबिनवर अतिक्रमण निर्मुलन पथकामार्फत कारवाईकोल्हापूरी गुळ जगभरात पोहोचण्यासाठी जीआय नोंदणी करा : डॉ. सुभाष घुलेकोल्हापूर येथे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा आढावा; राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिल्या महत्त्वपूर्ण सूचनाडॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला 'व्हेरी गुड' श्रेणीडी. वाय पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवणार : डॉ. संजय डी. पाटील; विद्यापीठाचा पाचवा स्थापना दिवस उत्साहात साजराडी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे ''राष्ट्रीय डॉक्टर डे' उत्साहात; कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्याकडून शुभेच्छाशक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या माथी मारु नका : सतेज पाटील विधानपरिषदेत कडाडले जिल्हाधिकारी लोकशाही दिन सोमवारी 7 जुलै रोजीविमा योजनेतील भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कधी कारवाई करणार ; सतेज पाटील यांचा सवाल : महिन्याच्या आत कारवाईचे कृषीमंत्र्यांचे आश्वासन

जाहिरात

 

कोल्हापूर : प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या तीन व्यापाऱ्यांकडून पंधरा हजार रुपये दंड वसूल

schedule24 Jun 25 person by visibility 249 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने बाजार गेट परिसरात एकल वापर प्लॅस्टिकची तपासणी आज करण्यात आली. यावेळी बाजार गेट परिसरातील अग्रवाल कटलरी, महालक्ष्मी कटलरी व इंडिया कटलरी या व्यापाऱ्यांकडे तपासणी दरम्यान अंदाजे 200 किलो प्लॅस्टीकचा साठा आढळून आल्याने यांना प्रत्येकी 5 हजार रुपयांचा दंड करुन 3 व्यापाऱ्यांकडून रु.15 हजार इतका दंड वसूल करण्यात आला. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने शहरात एकल वापर प्लॅस्टिक बंदी मोहिमेची प्रभावी राबविण्यात येत आहे.

  ही मोहिम प्रशासक के.मंजूलक्ष्मी व अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. आजची ही कारवाई सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील व मुख्य आरोग्य निरिक्षक डॉ.विजय पाटील यांच्या सूचनेनुसार आरोग्य निरीक्षक सुशांत कांबळे, मुकादम सुरक्षा सोहनी, वनिता सूर्यवंशी व कर्मचाऱ्यांनी केली. यावेळी या व्यापा-यसांना येथून पुढे प्लास्टिकचा वापर करु नये अशा सक्त सूचना देण्यात आल्या.

 त्याचप्रमाणे राजारामपुरी परिसरातही एकल वापर प्लॅस्टिकची तपासणी करण्यात आली. यामध्ये मिरजकर पोहे सेंटर, सुनील बँगल्स व फ्लॉवर गिफ्ट हाऊस अशा तीन दुकानदारांकडून अंदाजे 20 किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले. सदरची कारवाई सहा.आयुक्त कृष्णा पाटील, आरोग्य निरिक्षक महेश भोसले, माधवी मसुरकर, मुकादम व कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात आली.

 तरी महानगरपालिकेच्या हद्दीमधील सर्व आस्थापना, व्यापारी व संस्था यांनी एकल वापर (सिंगल युज) प्लॅस्टिकचा वापर बंद करणेचा आहे. जर शहरामध्ये एकल वापर (सिंगल युज) प्लॅस्टिकचा वापर करताना आढळल्यास त्या आस्थापना, संस्था व नागरीकांवर आरोग्य विभागामार्फत दंडात्मक कांरवाई करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी सिंगल युज प्लॅस्टीकचा वापर टाळावा व कापडी पिशवीचा वापर करावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes