SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
महाविस्तार AI अँपद्वारे शेतीत डिजिटल क्रांती; जिल्ह्यात ७५ हजारांहून अधिक नोंदणीदुचाकी वाहनांची नवी नोंदणी मालिका 25 फेब्रुवारी पासून सुरुलोकप्रतिनिधीच्या सूचना विचारात घेऊन वार्षिक मुल्यदर निश्चित करण्यासाठी प्रस्ताव पाठवावा : जिल्हाधिकारी अमोल येडगेशिवाजी विद्यापीठात बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती‘गोकुळ’ परिवारातील सदस्यांची जि.प. निवड अभिमानास्पद : नविद मुश्रीफ; गोकुळ मार्फत मान्यवरांचा सत्कारकोल्हापुरात 'कव्वाली महोत्सवा'चे २१ फेब्रुवारीपासून आयोजनशिवाजी विद्यापीठात उद्या ‘अकौंन्टन्सी म्युझियम ऑफ इंडिया’चे उद्घाटनशिवाजी विद्यापीठात रविवारी नोकरी महामेळाव्याचे आयोजन; ८००० जागांच्या भरतीसाठी मुलाखती होणार'संशोधन प्रकल्प निधी कसा मिळवावा' या विषयावर शिवाजी वि‌द्यापीठामध्ये उद्या एकदिवसीय कार्यशाळा‘गोकुळ’ कडून म्हैस दूध खरेदी दरात १ रुपये व गाय दूध खरेदी दरात २ रूपये वाढ : चेअरमन नविद मुश्रीफ

जाहिरात

 

शिवाजी विद्यापीठात रविवारी नोकरी महामेळाव्याचे आयोजन; ८००० जागांच्या भरतीसाठी मुलाखती होणार

schedule20 Feb 26 person by visibility 116 categoryराज्य

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा मध्यवर्ती रोजगार कक्ष, डॉ. ज्ञानेश्वर मुळे फाऊंडेशन आणि विद्यापीठ विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी (दि. २२ फेब्रुवारी) विद्यापीठात राज्यस्तरीय नोकरी महामेळावा आयोजित करण्यात येत आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सकाळी १० वाजता या महामेळाव्याचे उद्घाटन करण्यात येणार असून यावेळी माहिती व तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती असेल, अशी माहिती विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेस कुलसचिव डॉ. विलास शिंदे, मध्यवर्ती रोजगार कक्षाचे समन्वयक डॉ. सुभाष कोंबडे आणि विद्यापीठ विकास मंचचे स्वागत परुळेकर उपस्थित होते.

प्र-कुलगुरू डॉ. जाधव म्हणाल्या की, या महामेळाव्यात १२५ हून अधिक नामांकित राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग निश्चित झाला असून साधारण १०,००० युवक, युवती उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. सदर मेळावा महाराष्ट्र राज्यातील युवकांच्या करिअर घडविण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पत्रकार परिषदेत देण्यात आलेल्या माहितीनुसार, सद्यस्थितीत वाढती स्पर्धा, बदलते उद्योग मानदंड आणि कौशल्यधिष्ठित रोजगाराच्या गरजा लक्षात घेता शिक्षण क्षेत्र व उद्योग क्षेत्र यांच्यात प्रभावी समन्वय साधणे अत्यावश्यक झाले आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित या मेळाव्यात १२५ पेक्षा अधिक नामांकित कंपन्यांचा सहभाग निश्चित झाला असून त्यामध्ये राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील आघाडीच्या कंपन्यांचाही समावेश आहे. विविध क्षेत्रांतील रोजगार संधी एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देणारा हा उपक्रम राज्यातील विशेषतः शिवाजी विद्यापीठासह संलग्नित महाविद्यालयांमधील आणि कोल्हापूर, सांगली व सातारा या जिल्ह्यांतील पात्र तरुणांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

या मेळाव्यास सुमारे दहा हजार युवक- युवती उपस्थित राहण्याची अपेक्षा असून अभियांत्रिकी, व्यवस्थापन, वाणिज्य, विज्ञान, कला, कायदा, फार्मा, नर्सिंग तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना थेट मुलाखतीद्वारे रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत. उद्योगजगत, शैक्षणिक संस्था व विद्यार्थी यांच्यातील दुवा अधिक बळकट करण्यासाठी हा मेळावा प्रभावी ठरणार आहे.

रोजगार महामेळाव्यात आंतरराष्ट्रीय पातळीवरील इंटरनॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स (जर्मनी आणि संयुक्त अरब अमिरात), बॉर्डर प्लस (जर्मनी) या कंपन्यांसह राष्ट्रीय पातळीवरील जे.एस.डब्ल्यू., अशोक लेलँड, रेमंड्स, के.आय.वाय. मोटर्स अदानी, मारुती सुझुकी, मार्कसन फार्म, टायटन लॅब, मेसेंजर्स प्रा.लि., दास ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज, वॉल्टर पॅक प्रा.लि. आणि स्थानिक पातळीवरील घाटगे पाटील इंडस्ट्रीज, वालचंदनगर इंडस्ट्रीज, मोरया ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज, युनिटी मोटर्स, श्रीराम इंडस्ट्रीज, सह्याद्री स्थापत्य प्रा.लि., मंत्री ऑटो कम्पोनन्ट्स, रोबोस्टॉर्म्स टेक प्रा.लि. इत्यादी कंपन्या सहभागी होणार आहेत.

मेळाव्यात सेवा क्षेत्रातीलही अग्रगण्य कंपन्या सहभागी होणार असून यामध्ये एल.आय.सी., एक्सिस बँक, टीडीएस कॅपिटल आयएमएफ प्रा.लि., स्मॉल फायनान्स बँक्स अँड कंपनीज, श्रीराम फायनान्स, जस्ट डायल, मारुती ऑटो, चेतन मोटर्स, सकाळ मीडिया, बजाज लाइफ इन्शुरन्स, डायस्टेल एज्युकेशन प्रा.लि., मार्व्ह्लस टेक्नॉलॉजीज यांचा समावेश आहे. मेळाव्यात बांधकाम क्षेत्रातील एसबी इंजिनिअर्स प्रा.लि. या कंपनीसह फार्मा क्षेत्रातील मार्कसन फार्मा, टायटन लॅब, लक्ष्मी ऑर्गेनिक इंडस्ट्रीज, टूलेक्स सिस्टीम प्रा.लि., एक्सेल इंडस्ट्रीज या कंपन्या सहभागी होणार आहेत.

▪️८००० जागांच्या भरतीसाठी मुलाखती
नोकरी महामेळाव्यात विविध क्षेत्रांतील एकूण ८००० जागा (व्हॅकन्सी) भरतीसाठी उपलब्ध असून आठवीपासून पीएचडीपर्यंत अशी कोणत्याही प्रकारची शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या, अनुभवी तसेच सर्व प्रकारच्या अभ्यासक्रमांना प्रवेशित अंतिम वर्षात शिक्षण घेणारे विद्यार्थी यांच्यासाठी नोकरीच्या संधी उपलब्ध असतील. इच्छुक उमेदवारांनी नोकरी महामेळाव्यास उपस्थित राहात असताना सोबत आपला बायोडाटा, शैक्षणिक व अनुभवाच्या सर्व कागदपत्रांच्या प्रतींचे किमान पाच संच आणि पासपोर्ट आकारातील छायाचित्रे सोबत ठेवावीत. आजपर्यंत या मेळाव्यासाठी विद्यापीठाच्या वेबसाईटवरील लिंकद्वारे सुमारे ४५०० उमेदवारांनी नोंदणी केली असून जागेवर नोंदणी आणि थेट मुलाखतीसाठीही उमेदवार उपस्थित राहू शकतात. विद्यापीठाने २५ अधिविभागांमध्ये ७५ मुलाखत कक्षांची उपलब्धता केली असून एकाच वेळी तेथे १५० उमेदवारांच्या मुलाखती घेता येणार आहेत. उमेदवारांच्या सोयीसाठी विद्यापीठाच्या प्रत्येक प्रवेशद्वारासह प्रत्येक अधिविभागाच्या ठिकाणीही कंपन्यांची नावे व मुलाखतीची ठिकाणे यांची माहिती असणारे फलक लावण्यात येतील. एका उमेदवाराला जास्तीत जास्त तीन कंपन्यांसाठी मुलाखती देता येऊ शकतील. तशा प्रकारचा नोंदणी अर्ज उमेदवारांनी उपस्थित झाल्यानंतर भरून द्यावयाचा आहे. उमेदवारांनी माहितीफलक व्यवस्थित वाचून घ्यावेत. गर्दी व गडबड न करता मुलाखती सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

▪️नोकरी महामेळाव्याचे स्थळ: शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

▪️दिनांक: रविवार, दि. २२ फेब्रुवारी २०२६

▪️वेळ: सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes