SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
12 व 13 मार्च रोजी आयटीआयमध्ये प्लेसमेंट ड्राईव्ह; उमेदवारांना नोकरीची संधीनगररचना विभागामार्फत एक दिवसाचा विशेष कॅम्पगर्भाशय मुखाच्या कर्करोग प्रतिबंधासाठी महापालिकेची एचपीव्ही लसीकरण मोहीम सुरूपाणी पुरवठा विभागाच्यावतीने थकीत 27 कनेक्शन व 7 अनाधिकृत कनेक्शनवर कारवाईकोल्हापूर फर्स्टकडून महानगरपालिकेस सीएसआर निधीतून चार स्विपिंग मशिन्स थकबाकीदार व्यवसायिक मिळकती सील करा, इतर मिळकतींवर बोजा नोंद करा : आयुक्त के.मंजूलक्ष्मीमहिला दिनानिमित्त आयोजीत आरोग्य शिबीराचा 254 महिला कर्मचा-यांनी घेतला लाभखळबळजनक: शिवीगाळ केल्याचा राग मनात धरला अन् थेट दगडाने ठेचून काढला जीव! कोल्हापुरातील धक्कादायक प्रकार; २४ तासांत आरोपींना बेड्यामहिलांना संधीचा अभाव ही गंभीर सामाजिक समस्या: डॉ. जगन्नाथ पाटीलअकार्यक्षम व बेजबाबदार EESL कंपनीचा कोल्हापूर महानगरपालीके ‌सोबतचा पथ दिव्यांचा करार रद्द करा

जाहिरात

 

सपना अरविंद कुपेकर-घुणकीकर : जिद्द, परिश्रम आणि प्रामाणिक सेवेतून घडलेला प्रेरणादायी प्रशासकीय प्रवास

schedule08 Mar 26 person by visibility 314 categoryसामाजिक

सपना अरविंद कुपेकर-घुणकीकर या मूळच्या कोल्हापूरच्या आहेत. त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण कोरगावकर हायस्कूलमध्ये झाले, तर बारावीचे शिक्षण विवेकानंद कॉलेजमधून पूर्ण झाले. शालेय जीवनात त्या अत्यंत हुशार आणि अभ्यासू विद्यार्थिनी म्हणून ओळखल्या जात. वर्गात नेहमी प्रथम क्रमांक मिळवणे तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवणे ही त्यांची वैशिष्ट्ये होती.

उच्च शिक्षणासाठी त्यांनी कोल्हापूर येथील भारती विद्यापीठातून बी.फार्म (B.Pharm) पदवी पूर्ण केली. त्यानंतर नवी मुंबईतील बेलापूर येथे एम.फार्म (M.Pharm) पदवी संपादन केली. एम.फार्ममध्ये त्यांनी क्वालिटी अॅश्युरन्स हा विशेष विषय निवडला.

बी.फार्म करत असताना त्यांना अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागातील ड्रग इन्स्पेक्टर पदाविषयी माहिती मिळाली आणि या क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा मिळाली. बी.फार्मनंतर त्यांनी मुंबईतील एका फार्मा कंपनीमध्ये तीन वर्षे काम करून व्यावसायिक अनुभव घेतला. त्यानंतर 2008 मध्ये त्यांनी सरळ सेवा भरती परीक्षेसाठी अर्ज केला. मुलाखतीत त्यांनी अत्यंत आत्मविश्वासाने उत्तरे दिली. मात्र ही भरती प्रक्रिया जवळपास चार वर्षे चालली. या दरम्यान त्यांनी एम.फार्मचे शिक्षणही पूर्ण केले.

शेवटी 2012 मध्ये त्यांची अन्न व औषध प्रशासन विभागात ड्रग इन्स्पेक्टर म्हणून नियुक्ती झाली. सुरुवातीला मुंबईतील मुख्यालयात त्यांची नेमणूक झाली. येथे त्यांनी सुमारे साडेचार वर्षे काम करत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय कामकाजाचे सखोल ज्ञान मिळवले. नियोजन, टीएमआर अॅक्ट, अपील यांसारख्या विषयांची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली.

यानंतर त्यांची बदली ठाणे येथे झाली. येथे त्यांनी प्रत्यक्ष फिल्डवर ड्रग इन्स्पेक्टर म्हणून काम केले. औषध दुकाने व उत्पादन केंद्रांची तपासणी करणे, विनापरवाना औषध विक्री रोखणे तसेच कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणे ही त्यांच्या कामाची प्रमुख जबाबदारी होती.
या काळात त्यांनी अनेक महत्त्वाच्या कारवाया केल्या. सरकारी रुग्णालयांसाठी असलेल्या इंजेक्शनवर लेबल बदलून विक्री केली जात असल्याचा प्रकार त्यांनी उघडकीस आणला. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी त्या मध्यप्रदेशातही गेल्या आणि संबंधित माल जप्त केला. त्यांच्या या धाडसी कामगिरीची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेत त्यांना प्रशस्तिपत्र देण्यात आले.
यानंतर त्यांची बदली कोल्हापूर येथे झाली. त्या काळात कोविड-19 महामारीमुळे अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. रुग्णांची संख्या वाढली होती आणि वैद्यकीय साधनसामग्रीची कमतरता भासत होती. विशेषतः रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. अशा कठीण परिस्थितीत त्यांनी अत्यंत संवेदनशीलतेने काम करत इंजेक्शनचा पुरवठा आणि नियोजन सुरळीत ठेवले. ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये यासाठीही त्यांनी विशेष प्रयत्न केले.
दरम्यान 2013 मध्ये त्यांनी राज्यसेवा आयोगाची स्पर्धा परीक्षा दिली होती. प्रक्रिया पूर्ण होऊन 2021 मध्ये निकाल जाहीर झाला आणि त्यांची सहाय्यक आयुक्त (Assistant Commissioner) पदावर निवड झाली. त्यांची पहिली नियुक्ती सांगली येथे झाली. येथे त्यांनी औषधांच्या उत्पादन व विक्री व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्याचे काम केले. परवाने देणे, त्यांचे नूतनीकरण, तपासणी तसेच बेकायदेशीर कामांवर कारवाई करणे ही त्यांच्या कामाची प्रमुख जबाबदारी आहे. नुकतीच त्यांनी विनापरवाना औषध उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवरही कारवाई केली आहे.
ड्रग इन्स्पेक्टरपासून सहाय्यक आयुक्त पदापर्यंतचा त्यांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. कोणतेही काम प्रामाणिकपणे आणि मनापासून करण्यावर त्यांचा नेहमी भर असतो.

त्यांच्या यशामागे कुटुंबाचा मोठा वाटा आहे. शिक्षण घेत असताना त्यांच्या वडिलांनी त्यांना नेहमी प्रोत्साहन दिले. ते त्यांना मुलासारखेच मानत आणि शिक्षणावर विशेष लक्ष देत. वर्गात नेहमी प्रथम क्रमांक मिळण्याचे श्रेय त्या आपल्या आई-वडिलांना देतात.

लग्नानंतर त्यांनी घर आणि करिअर दोन्ही जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या. त्यासाठी त्यांच्या पती अरविंद कुपेकर यांचा त्यांना मोठा पाठींबा मिळाला.

त्यांच्या कुटुंबात प्रशासकीय सेवेची परंपरा आहे. त्यांचे आजोबा आणि वडील महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत होते. त्यांचे वडील स्व. सुरेंद्र कांबळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावरून निवृत्त झाले, तर काका श्री. बी. जे. कांबळे-घुणकीकर महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागात महाव्यवस्थापक म्हणून कार्यरत होते.

आजच्या पिढीत प्रशासकीय सेवेत असलेल्या त्या एकमेव व्यक्ती आहेत. त्यांच्या जिद्दीमुळे आणि कर्तव्यनिष्ठेमुळे त्यांनी प्रशासनात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
आज औषधे ही मानवी जीवनाचा अत्यंत महत्त्वाचा भाग बनली आहेत. या औषधांची निर्मिती, विक्री आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याचे महत्त्वपूर्ण काम अन्न व औषध प्रशासन (FDA) करते. सध्या ब्रह्ममुंबई येथे सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या सपना अरविंद कुपेकर-घुणकीकर यांचा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes