SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
12 व 13 मार्च रोजी आयटीआयमध्ये प्लेसमेंट ड्राईव्ह; उमेदवारांना नोकरीची संधीनगररचना विभागामार्फत एक दिवसाचा विशेष कॅम्पगर्भाशय मुखाच्या कर्करोग प्रतिबंधासाठी महापालिकेची एचपीव्ही लसीकरण मोहीम सुरूपाणी पुरवठा विभागाच्यावतीने थकीत 27 कनेक्शन व 7 अनाधिकृत कनेक्शनवर कारवाईकोल्हापूर फर्स्टकडून महानगरपालिकेस सीएसआर निधीतून चार स्विपिंग मशिन्स थकबाकीदार व्यवसायिक मिळकती सील करा, इतर मिळकतींवर बोजा नोंद करा : आयुक्त के.मंजूलक्ष्मीमहिला दिनानिमित्त आयोजीत आरोग्य शिबीराचा 254 महिला कर्मचा-यांनी घेतला लाभखळबळजनक: शिवीगाळ केल्याचा राग मनात धरला अन् थेट दगडाने ठेचून काढला जीव! कोल्हापुरातील धक्कादायक प्रकार; २४ तासांत आरोपींना बेड्यामहिलांना संधीचा अभाव ही गंभीर सामाजिक समस्या: डॉ. जगन्नाथ पाटीलअकार्यक्षम व बेजबाबदार EESL कंपनीचा कोल्हापूर महानगरपालीके ‌सोबतचा पथ दिव्यांचा करार रद्द करा

जाहिरात

 

कोल्हापूर मर्कजचे प्रमुख (आमिरसाब) हाजी दिलावर मुल्लाणी यांचे निधन

schedule08 Mar 26 person by visibility 741 categoryराज्य

कोल्हापूर  : कोल्हापूर मर्कज प्रमुख अर्थात धर्मगुरू  हाजी दिलावर मुल्लाणी (बालिंगे)  यांचे आज रविवारी दुःखद निधन झाले आहे, त्यांचा दफनविधी आज रात्री तराबिह च्या नमाज नंतर 10 वाजून 30 मिनिटांनी बागलचौक कब्रस्तान येथे होणार आहे,

गेली 15 वर्षे कोल्हापूर मर्कजचे प्रमुख धर्मगुरू म्हणून ते कार्यरत होते, त्यामुळे त्यांचा कोल्हापूर व आसपासच्या जिल्ह्यात मोठा संपर्क होता.मुस्लीम समाजातील प्रत्येक घटकांशी त्यांचे अतूट नाते निर्माण झाले होते, प्रत्येकाला सोबत घेऊन जाण्याच्या व समाजातील उदभवणाऱ्या प्रत्येक प्रश्नांच्या सोडवणूकीत त्यांची प्रमुख भूमिका असे. निहाल पैलवान मस्जिद अर्थात कोल्हापूर जिल्हा मर्कजचे केंद्र .या ठिकाणी दररोज ते आपल्या सहकाऱ्यांसोबत बैठकीत असायचे.आपली प्रकृती स्थिर नसताना देखील जिल्ह्यात दौरा करून मुस्लिम समाजातील प्रश्नांची सोडवणूक करण्यात त्यांचा पुढाकार होता..

मुस्लिम समाजाचे धर्मगुरू म्हणून महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश , उत्तर प्रदेश दिल्ली,या ठिकाणी त्यांना मानणारा वर्ग खूप मोठा होता.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes