SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आरोग्य विभागाच्या सर्व्हेक्षणामध्ये 31 घरांमध्ये डेंग्यु आढळलेकोल्हापूर : पर्ल हॉटेल समोरील अनधिकृत फुलवाले केबिनवर अतिक्रमण निर्मुलन पथकामार्फत कारवाईकोल्हापूरी गुळ जगभरात पोहोचण्यासाठी जीआय नोंदणी करा : डॉ. सुभाष घुलेकोल्हापूर येथे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा आढावा; राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिल्या महत्त्वपूर्ण सूचनाडॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला 'व्हेरी गुड' श्रेणीडी. वाय पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवणार : डॉ. संजय डी. पाटील; विद्यापीठाचा पाचवा स्थापना दिवस उत्साहात साजराडी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे ''राष्ट्रीय डॉक्टर डे' उत्साहात; कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्याकडून शुभेच्छाशक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या माथी मारु नका : सतेज पाटील विधानपरिषदेत कडाडले जिल्हाधिकारी लोकशाही दिन सोमवारी 7 जुलै रोजीविमा योजनेतील भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कधी कारवाई करणार ; सतेज पाटील यांचा सवाल : महिन्याच्या आत कारवाईचे कृषीमंत्र्यांचे आश्वासन

जाहिरात

 

मित्रांनी जपले अनोखे मैत्र...

schedule25 Jun 25 person by visibility 342 categoryशैक्षणिक

कोल्हापूर  : मनपा राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्रमांक 11 कसबा बावडा या शाळेत आज बुधवारी एक मित्र समूह एकत्र आला. मनोज पाटील , ऋषिकेश वरुटे, आशिष पाटील ,अमोल जाधव,योगेश पुजारी, ओमकार घुमे, दिग्विजय जगताप आणि त्यांचे सहकारी शाळेत आले. या शाळेचा त्यांचा कसलाही संबंध नसतांनाही आपल्या मित्राच्या चिरंतन स्मृती निर्माण करण्याची त्यांनी घेतली प्रतिज्ञा,धडपड एक शिक्षण पूरक उपक्रम पूर्ण करून गेली.

SGI कॉलेज 2018 सालात इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये असताना अपघातात गमावलेल्या मित्राच्या जन्म दिनी  ही ध्येय वेडे तरुण एकत्र येतात आणि आपल्या स्मृतीशेष मित्राला अभिनव अभिवादन देतात. गरजू ,होतकरू विद्यार्थ्यांना सहाय्यभूत होईल अशा शैक्षणिक साहित्याचे वितरण स्व खर्चाने करतात आणि एक मित्र गमावला तरी अवघे विश्व ची माझे घर या भावनेने नवीन बाल चमू असंख्य विद्यार्थ्यांना आपले मित्र बनवतात.......14 जून हा  दिवंगत वैभव संभाजी वाडकर यांचा जन्म दिन. तो साजरा करायला वैभव स्वतः या जगात नाहीत पण त्यांचे  हे मित्र प्रत्येक वर्षी विविध ठिकाणी वैभव यांच्या जन्म दिनी समाज उपयोगी उपक्रम करतात. आज आमच्या शाळेस स्मार्ट टी व्हि. प्रदान करून वैभव यांच्या स्मृती गंधात संपूर्ण शाळा दरवळेल आणि दुरितांचे अज्ञान  तिमिर  घालवण्यासाठी एक छोटासा दिप प्रज्वलित केला.

या कार्यक्रम प्रसंगी मनपा राजर्षी शाहू विद्यामंदिर क्रमांक 11 कसबा बावडा कोल्हापूरचे केंद्रमुख्याध्यापक डॉ. अजितकुमार पाटील उपमुख्याध्यापक  उत्तम कुंभार तसेच शाळेमधील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes