SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आरोग्य विभागाच्या सर्व्हेक्षणामध्ये 31 घरांमध्ये डेंग्यु आढळलेकोल्हापूर : पर्ल हॉटेल समोरील अनधिकृत फुलवाले केबिनवर अतिक्रमण निर्मुलन पथकामार्फत कारवाईकोल्हापूरी गुळ जगभरात पोहोचण्यासाठी जीआय नोंदणी करा : डॉ. सुभाष घुलेकोल्हापूर येथे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा आढावा; राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिल्या महत्त्वपूर्ण सूचनाडॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला 'व्हेरी गुड' श्रेणीडी. वाय पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवणार : डॉ. संजय डी. पाटील; विद्यापीठाचा पाचवा स्थापना दिवस उत्साहात साजराडी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे ''राष्ट्रीय डॉक्टर डे' उत्साहात; कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्याकडून शुभेच्छाशक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या माथी मारु नका : सतेज पाटील विधानपरिषदेत कडाडले जिल्हाधिकारी लोकशाही दिन सोमवारी 7 जुलै रोजीविमा योजनेतील भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कधी कारवाई करणार ; सतेज पाटील यांचा सवाल : महिन्याच्या आत कारवाईचे कृषीमंत्र्यांचे आश्वासन

जाहिरात

 

शहापुरात मित्राचा खून; संशयित ताब्यात

schedule14 Jun 25 person by visibility 249 categoryगुन्हे

यड्राव : शहापूर येथे गावाकडील जुन्या वादातून गणेश रमेश पाटील (वय 21) (रा. आगर ता. शिरोळ) या मित्राला कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले.  उपचारादरम्यान त्याचा मृत्य झाला. ही घटना लोटस पार्क कमानी समोरील शहापूर हद्दीत मोकळ्या मैदानात शुक्रवारी रात्री घडली. या प्रकरणी अभिषेक सुकुमार मस्के (वय 19) रा. आगर ता. शिरोळ याला पोलिसांनी रात्री उशीरा ताब्यात घेतले आहे. याबाबतची फिर्याद  शहापूर पोलीस ठाण्यात दिली आहे.

गणेश व अभिषेक हे दोघे मित्र असून  दोन वर्षांपूर्वी गावाकडील काही वाद होता.  या रागातून लोटस पार्क कमानी समोरील शहापूरकडे जाणाऱ्या मार्गावर अभिषेक व गणेश यांच्यामध्ये वाद झाला. यातून अभिषेक यांने कोयत्याने गणेशवर  वार केले. गणेश रक्ताच्या थारोळ्यात पडला. मार्गावरून येणाऱ्या नागरिकांनी याबाबतची माहिती शहापूर पोलिसांना कळवली. शहापूर पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन गणेशला इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या ठिकाणी त्याच्यावर प्राथमिक उपचार करून प्रकृती चिंताजनक असल्यामुळे पुढील उपचारासाठी त्याला सांगली सिव्हिल रुग्णालयात पाठविण्यात आले.

 गणेश याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. संशयित आरोपी अभिषेक मस्केला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes