SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
महाविस्तार AI अँपद्वारे शेतीत डिजिटल क्रांती; जिल्ह्यात ७५ हजारांहून अधिक नोंदणीदुचाकी वाहनांची नवी नोंदणी मालिका 25 फेब्रुवारी पासून सुरुलोकप्रतिनिधीच्या सूचना विचारात घेऊन वार्षिक मुल्यदर निश्चित करण्यासाठी प्रस्ताव पाठवावा : जिल्हाधिकारी अमोल येडगेशिवाजी विद्यापीठात बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती‘गोकुळ’ परिवारातील सदस्यांची जि.प. निवड अभिमानास्पद : नविद मुश्रीफ; गोकुळ मार्फत मान्यवरांचा सत्कारकोल्हापुरात 'कव्वाली महोत्सवा'चे २१ फेब्रुवारीपासून आयोजनशिवाजी विद्यापीठात उद्या ‘अकौंन्टन्सी म्युझियम ऑफ इंडिया’चे उद्घाटनशिवाजी विद्यापीठात रविवारी नोकरी महामेळाव्याचे आयोजन; ८००० जागांच्या भरतीसाठी मुलाखती होणार'संशोधन प्रकल्प निधी कसा मिळवावा' या विषयावर शिवाजी वि‌द्यापीठामध्ये उद्या एकदिवसीय कार्यशाळा‘गोकुळ’ कडून म्हैस दूध खरेदी दरात १ रुपये व गाय दूध खरेदी दरात २ रूपये वाढ : चेअरमन नविद मुश्रीफ

जाहिरात

 

‘गोकुळ’ कडून म्हैस दूध खरेदी दरात १ रुपये व गाय दूध खरेदी दरात २ रूपये वाढ : चेअरमन नविद मुश्रीफ

schedule20 Feb 26 person by visibility 207 categoryउद्योग

▪️दूध उत्पादकांना महिन्याला साडे सात कोटी रुपये अधिक मिळणार

कोल्हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) संघाशी संलग्न दूध उत्पादकांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळावा आणि दुग्ध व्यवसाय अधिक सक्षम व्हावा, म्हैस व गाय दूध उत्पादकांना दूध वाढविणेस प्रोत्साहन मिळावे म्हणून संघाने सध्याचे म्हैस व गाय दूध खरेदी दरामध्‍ये वाढ करण्याचा निर्णय घेतला असून दि.२१/०२/२०२६ इ. रोजी पासून म्हैस दूध खरेदी दरामध्ये ६.० फॅट व ९.० एस.एन.एफ करीता प्रतिलिटर रुपये ५२.५० वरून रूपये ५३.५० करण्यात आला आहे. तर गाय दूध खरेदी दर ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ करीता प्रतिलिटर दर ३४.०० रूपये वरून ३६.०० रूपये करण्यात आला आहे. या दरवाढीमुळे गोकुळच्या म्हैस व गाय दूध उत्पादकांना महिन्याकाठी सुमारे सात ते साडे सात कोटी रुपयाचा जादाचा दर मिळणार आहे. 

 गोकुळ संलग्न ७ हजार ५०० प्राथमिक दूध संस्थांच्या माध्यमातून जवळ-जवळ १७ लाख लिटर प्रतिदिन संकलन केले जाते. गोकुळचे दूध उत्पादक हेच केंद्रबिंदू असून त्यांच्या श्रमाला न्याय मिळावा यासाठी गोकुळ नेहमीच कार्यरत राहिला आहे. दूध उत्पादक, संस्था, सचिव, कर्मचारी प्रत्येक घटक हा गोकुळ परिवाराचा अविभाज्य भाग आहे. दूध उत्पादकांच्या प्रगतीसाठी आणि दुग्ध व्यवसाय वाढीसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. असे गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी पत्रकाद्वारे सांगितले. दि.२०/०२/२०२६ इ.रोजीच्‍या संचालक मंडळाच्‍या बैठकीमध्ये सद्य बाजार स्थितीचा विचार करून निर्णय घेण्‍यात आला आहे.

  तसेच लवकरच संघामार्फत प्राथमिक दूध संस्थाना सुधारित दरपत्रक पाठवणेत येणार आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes