SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आरोग्य विभागाच्या सर्व्हेक्षणामध्ये 31 घरांमध्ये डेंग्यु आढळलेकोल्हापूर : पर्ल हॉटेल समोरील अनधिकृत फुलवाले केबिनवर अतिक्रमण निर्मुलन पथकामार्फत कारवाईकोल्हापूरी गुळ जगभरात पोहोचण्यासाठी जीआय नोंदणी करा : डॉ. सुभाष घुलेकोल्हापूर येथे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा आढावा; राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिल्या महत्त्वपूर्ण सूचनाडॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला 'व्हेरी गुड' श्रेणीडी. वाय पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवणार : डॉ. संजय डी. पाटील; विद्यापीठाचा पाचवा स्थापना दिवस उत्साहात साजराडी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे ''राष्ट्रीय डॉक्टर डे' उत्साहात; कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्याकडून शुभेच्छाशक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या माथी मारु नका : सतेज पाटील विधानपरिषदेत कडाडले जिल्हाधिकारी लोकशाही दिन सोमवारी 7 जुलै रोजीविमा योजनेतील भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कधी कारवाई करणार ; सतेज पाटील यांचा सवाल : महिन्याच्या आत कारवाईचे कृषीमंत्र्यांचे आश्वासन

जाहिरात

 

संशोधक घडवताना डॉ. जिरगे यांचे संपादकीय आणि वैज्ञानिक नेतृत्व; ASPIRE 2025 सिंगापूरमध्ये भारताची प्रेरणादायी उपस्थिती

schedule03 May 25 person by visibility 409 categoryआरोग्य

सिंगापूर : प्रजनन विज्ञानाच्या आंतरराष्ट्रीय क्षेत्रात भारताचा दबदबा अधिक बळकट करत, ASPIRE (Asia Pacific Initiative on Reproduction) संस्थेच्या अधिकृत शास्त्रीय जर्नल Fertility and Reproduction च्या कार्यवाह संपादक डॉ. पद्मा रेखा जिरगे यांचा ASPIRE 2025 या वार्षिक परिषदेत मानाचा सहभाग असून, ही परिषद १ ते ५ मे २०२५ दरम्यान सिंगापूरमध्ये होत आहे.

ही परिषद महिला आणि पुरुष वंध्यत्वाच्या विविध पैलूंवर केंद्रित असून, उपचार प्रक्रियेत वैद्यकीय तसंच भावनिक व सामाजिक अडचणींचा सखोल आढावा घेतला जाणार आहे. या अडचणींवर मात करण्यासाठी नविन संशोधन, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नैतिक दृष्टिकोन कसा उपयोगी पडतो, यावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन होईल.

या परिषदेत डॉ. जिरगे एक विशेष कार्यशाळा घेणार असून, ती शास्त्रीय लेखनातील गुणवत्ता सुधारणा आणि संशोधन जर्नल्ससाठी सक्षम समिक्षक (peer reviewers) घडवण्यावर लक्ष केंद्रित करेल. या उपक्रमामुळे आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील संशोधक आणि नवोदित लेखकांना व्यावहारिक प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळणार आहे.

तसेच डॉ. जिरगे दोन महत्त्वपूर्ण वैज्ञानिक सत्रांचे अध्यक्षस्थान भूषवणार असून, ‘Young Awardees’ या विशेष सत्राचेही संचालन करतील. या सत्रातून उदयोन्मुख संशोधकांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आपल्या संशोधनाचे सादरीकरण करण्याची संधी मिळेल.

डॉ. जिरगे यांची भूमिका केवळ संपादकीय नेतृत्वापुरती मर्यादित नसून, प्रजनन शास्त्र क्षेत्राला वैज्ञानिक आणि नैतिक दृष्टिकोनातून दिशा देणारी ठरत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes