SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डाक पुरस्कारार्थी हे देशाचे नवरत्न : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधियाकोल्हापुरातील शंभर कोटींचे रस्ते दर्जाहीन! पावसाळ्यात टिकतील का?, आमदार सतेज पाटील यांचा सवालकाँग्रेसने केली इंडिया आघाडीबरोबर चर्चाप्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग औपचारिकरण योजनेबाबत खासदार धनंजय महाडिक यांनी संसदेचे वेधले लक्षडॉ. सी.एन. अश्वथ नारायण यांनी घेतले श्री अंबाबाईचे दर्शनमेरी वेदर क्रिकेट क्लब यांच्या वतीने पंचगंगा स्मशानभूमीसाठी ३० हजार शेणी दान उत्कृष्ट गणेश मंडळांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते बक्षिस वितरणनिवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासाठी आवश्यक असणाऱ्या कार्यालयांची अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्याकडून पाहणीकोल्हापूर महापालिकेच्या 53 व्या वर्धापन दिनानिमित्त देशाच्या रक्षणाकरीता धारातीर्थ पडलेल्या जवानांच्या वीरमाता, वीरपिता व वीरपत्नी यांचा सत्कारडीकेटीईच्या दीपक खुबन्नावरची स्केटिंगमध्ये दबदबा दोन सुवर्णपदकांसह राज्यस्तरवर निवड

जाहिरात

 

रखडलेल्या सातारा ते कागल महामार्गाच्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका, महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत वाहनांकडून टोल वसुली करू नका : खासदार धनंजय महाडिक

schedule12 Dec 25 person by visibility 455 categoryराज्य

▪️ केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी यांच्याकडे मागणी
कोल्हापूर  : सातारा ते कागल या महामार्गाचे काम रखडले आहे. शिवाय महामार्गावरील खड्डे, ठिकठिकाणी निर्माण झालेली बाह्य वळणे, यामुळे पुणे ते कोल्हापूर महामार्गावरून प्रवास करणे म्हणजे दिव्य बनले आहे. अशा परिस्थितीत आज नवी दिल्लीत केंद्रीय सडक आणि परिवहन मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी आढावा बैठक घेतली.

 सातारा ते कागल महामार्गाचे रखडलेले काम आणि दुरवस्था लक्षात घेता, संबंधीत कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे आणि महामार्ग सुस्थितीत येईपर्यंत वाहनधारकांकडून टोल वसुली करू नये, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी केली.

सातारा ते कागल महामार्गाचे सहापदरीकरणाचे काम गेले दोन वर्षे सुरू आहे. पण अत्यंत संथ गतीने सुरू असलेल्या कामामुळे वाहनधारक हैराण झाले आहेत. सातारा ते कागल महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे आहेत. वारंवार येणार्‍या बाह्य वळणांमुळे प्रवासाला प्रचंड वेळ लागत आहे. पावसाळ्यात तर सातारा ते कागल महामार्गाची भीषण अवस्था झाली होती. या पार्श्‍वभूमीवर आज नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी बैठक घेतली. त्याला राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी आणि खासदार धनंजय महाडिक उपस्थित होते.

सातारा ते कागल महामार्गाचे काम प्रचंड रखडले असून, संबंधीत ठेकेदाराला ताबडतोब निलंबित करावे आणि नव्या सक्षम कंपनीकडे हे काम सोपवावे, अशी मागणी खासदार महाडिक यांनी केली. तसेच जोपर्यंत महामार्गाचे काम दर्जेदार रित्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत वाहनधारकांकडून टोल घेवू नये, अशी मागणीही खासदार महाडिक यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे केली आहे. दरम्यान गेल्या सहा महिन्यात केवळ दोन टक्के काम केलेल्या संबंधीत ठेकेदारावर कारवाई सुरू केल्याचे नामदार गडकरी यांनी स्पष्ट केले. तसेच खासदार महाडिक यांनी केलेल्या मागणीबाबतही योग्य कार्यवाही करू, असे सांगितले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes