SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शिवाजी विद्यापीठात उद्यापासून जागतिक पर्यावरण अभियानराज्यसभा पोटनिवडणुकीसाठी १८ जूनला मतदानउत्पादन आणि लॉजिस्टिक्सच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकेईएम रुग्णालयात अत्याधुनिक ‘व्हेसल सीलर’ उपकरणे उपलब्ध; गरीब रुग्णांना मोठा दिलासा'स्वर्गीय आमदार पी. एन. पाटील म्हणजे तळागाळातील कार्यकर्त्यांचा आधारवड'चालुक्याज् क्रीडा महोत्सव २०२६: जिमनास्टिक्स व बास्केटबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न; पुणे आणि साताऱ्याची बाजीकागलमध्ये राजमाता जिजाऊ बसचे स्वागत; मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बसचे पूजनबंधुत्वाचा अनोखा उत्सव: नॅशनल ब्रदर्स डेमतदार याद्यांच्या अचूकतेसाठी २० जूनपासून 'विशेष सखोल पुनरीक्षण' मोहीमअनुष्का जमदाडे व हर्षला पाटील यांची राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड

जाहिरात

 

चालुक्याज् क्रीडा महोत्सव २०२६: जिमनास्टिक्स व बास्केटबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न; पुणे आणि साताऱ्याची बाजी

schedule24 May 26 person by visibility 138 categoryक्रीडा

कोल्हापूर : चालुक्याज् स्पोर्ट्स अकॅडेमी, कोल्हापूर यांच्या वतीने "खेळ, शिस्त, सन्मान, गुणवत्ता" या ध्येयवाक्याने प्रेरित चालुक्याज् क्रीडा महोत्सव २०२६ अंतर्गत जिमनास्टिक्स चॅम्पियनशिपचे भव्य आयोजन सोमवार, २५ मे २०२६ रोजी सकाळी ९ वाजता श्री दत्त स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, नागाळा पार्क येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेत अंडर ८, १०, १२ आणि १४ वयोगटांतील मुला-मुलींसाठी फ्लोअर एक्सरसाइज, स्प्रिंगबोर्ड, बॅलन्स बीम, व्हॉल्टिंग टेबल व पॅरलल बार अशा विविध क्रीडाप्रकारांचा समावेश असून यासाठी गुगल फॉर्मद्वारे २३ मे पर्यंत नोंदणी करण्यात आली होती. याच महोत्सवांतर्गत आयोजित बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेचा भव्य बक्षीस वितरण सोहळा नुकताच संपन्न झाला.

 या स्पर्धेत आयुष दोनकर, पृथ्वीराज आवळे, दीपक पाटील, अमित दलाल, आतिश सातवेकर, विश्वजित रामलिंग, अनिरुद्ध विटेकर, सूरज वाघेला, प्रतीक काशीद व अजित तिवडे यांनी उत्तम पंचगिरी केली, तर अमित दलाल, अरुण पवार, तन्मय सर, ऋषभ गडेचा, केदार सुतार व संदीप खोत या प्रशिक्षकांचा विशेष सत्कार करण्यात आला. स्पर्धेत मुलांमधून श्रवण पवार (रणजीत अकॅडेमी, सातारा) आणि मुलींमधून लिलियान जेकब (विद्यानचळ, पुणे) यांनी सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान पटकावला.

बास्केटबॉल स्पर्धेच्या अंतिम निकालामध्ये मुलींच्या गटात विद्यानचळ, पुणे संघाने प्रथम क्रमांक (रुपये ७,७७७) पटकावला, तर रणजीत अकॅडेमी, सातारा संघाने द्वितीय (रुपये ५,५५५) आणि एस. जी. अकॅडेमी, पुणे संघाने तृतीय क्रमांक (रुपये ३,३३३) मिळवला. मुलांच्या गटात रणजीत अकॅडेमी, सातारा संघाने प्रथम क्रमांक (रुपये ७,७७७), फ्लाय बास्केटबॉल अकॅडेमी, कोल्हापूर संघाने द्वितीय (रुपये ५,५५५) आणि काउन्सिल ऑफ एज्युकेशन, कोल्हापूर संघाने तृतीय क्रमांक (रुपये ३,३३३) प्राप्त केला.

 ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बास्केटबॉल असोसिएशन ऑफ कोल्हापूर डिस्ट्रिक्ट, पंच मंडळ, ग्राउंड स्टाफ, स्वयंसेवक आणि प्रायोजकांचे मोलाचे योगदान लाभले. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजन समितीच्या  पुनम शिंदे,  संतोष बाबर व  त्रिवेणी पुंगावकर यांनी सर्व खेळाडू, प्रशिक्षक व पालकांचे आभार मानले. उपस्थितांनी विजेत्या संघांचे अभिनंदन करत इतर संघांना पुढील स्पर्धांसाठी अधिक जोमाने तयारी करण्याचे आवाहन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes