SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिनविकसित कृषी संकल्प अभियान अंतर्गत गडहिंग्लज तालुक्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन समृद्धी महामार्ग वाढवण बंदराशी जोडणार;हा महामार्ग राज्याच्या समृद्धीचा कॉरिडॉर ठरेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकोल्हापूर महापालिकेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण जनजागृती रॅली जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने भाजपाच्या वतीने वृक्षारोपण आणि संवर्धनशिवराज्याभिषेक दिनानिमित्त आप तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन; शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन पीक विविधतेतून उत्पन्नवाढ शक्य : डॉ. गणेश कदम: डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शनशिवाजी विद्यापीठात पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपणस्वच्छता आणि पर्यावरणपूरक उपक्रमामुळे कोल्हापूर औद्योगिक क्षेत्रात 'क्लीन अँड ग्रीन'चा आदर्श : जिल्हाधिकारी अमोल येडगेमहिला संरक्षणाला विशेष प्राधान्य, अपर पोलिस अधीक्षक धिरजकुमार बच्चू यांचे प्रतिपादन

जाहिरात

 

आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपा मैदानात : नामदार चंद्रकांतदादा पाटील

schedule04 Jun 25 person by visibility 255 categoryराजकीय

▪️भाजपा कोल्हापूरच्या वतीने आयोजित शासकीय दाखले, आधार शिबिरांच्या ठिकाणी नाम.चंद्रकांत दादा पाटील यांच्या भेटी

कोल्हापूर :  भारतीय जनता पार्टी कोल्हापूर महानगरच्यावतीने नाम.चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार येत्या महिना भरात शासकीय दाखले सर्व सामान्य नागरिकांना उपलब्ध होण्यासाठी कोल्हापूर शहरामध्ये अनेक ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आज लक्ष्मीपुरी मंडलात नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आयोजित शिबिराच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला तसेच लक्ष्मीपुरी मंडलातील कार्यकर्त्यांना अक्कमहादेवी मंडप हॉल मध्ये झालेल्या बैठकीत संबोधित केले.
याप्रसंगी बोलताना नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी मानून त्यांना आवश्यक सामाजिक, आरोग्याच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे तसेच आपापल्या परिसरात रोजगार निर्मितीसाठी प्रयत्नशील राहावे अशा सामाजिक आणि  लोकोपयोगी विविध उपक्रमांसाठी भाजपा सदैव आपल्या पाठीशी असल्याचे नमूद केले. आगामी महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ही संधी जनसेवा म्हणून उपयोगात आणावी असे प्रतिपादन केले.

याप्रसंगी शैक्षणिक वर्षाची सुरवात लवकरच होत असून विद्यार्थी आणि पालकांच्या सोईसाठी ही शिबिरे आयोजित करत असल्याचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी नमूद केले आहे.

याप्रसंगी प्रदेश सचिव महेश जाधव, प्र.का.सदस्य राहूल चिकोडे, विशाल शिराळकर, धनश्री तोडकर, आप्पा लाड, अतुल चव्हाण, संतोष माळी, विजय दरवान, अवधूत भाट्ये, रश्मी साळोखे, विजयमाला जाधव, आसावरी जुगदार, महेश यादव, मंगला निपाणीकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

या शिबिरामध्ये आधार कार्ड अपडेट / दुरुस्ती, मोफत उत्पन्न दाखला, मोफत रहिवासी दाखला, मोफत डिजिटल रेशनकार्ड व आधारकार्ड इत्यादी अनेक दाखले उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
भाजपा कोल्हापूरच्या वतीने शहरातील 81 प्रभगांत या पद्धतीची शिबिरे होणार असून पहिल्या टप्प्यात दिनांक ३ जून ते १४ जून या कालावधीत २५ ठिकाणी शिबिरांचे आयोजित करण्यात आले असून या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन भारतीय जनता पार्टीच्या वतीने करणात येत आहे.

शिबीराबाबत अधिकची माहितीसाठी आपल्या प्रभागातील भाजपा पदाधिकारी किंवा भाजपा जिल्हा कार्यालय नागाळा पार्क येथे संपर्क साधावा. दूरध्वनी क्रमांक ०२३१- २५४८१०३

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes