सुतारवाडा, चित्रदुर्ग मठ व सारस्वत वस्तीगृह या निवारा केंद्रास प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांची भेट
schedule25 Jun 25 person by visibility 302 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : पंचगंगा नदीची पाणी पातळी सतत वाढत असल्याने संभाव्य पूरपरिस्थितीची अनुषंगाने प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी सायंकाळी सुतारवाडा, चित्रदुर्ग मठ व सारस्वत ब्राम्हण विद्यार्थी वस्तीगृहास भेट दिली. यावेळी प्रशासकांनी सुतारवाडा येथील नागरीकांशी चर्चा करुन त्यांना इशारा पातळी गाठताच स्थलांतरीत होण्याच्या सूचना केल्या.
यानंतर चित्रदुर्ग मठ व सारस्वत ब्राह्मण विद्यार्थी वस्तीगृहास या निवारा केंद्राची पाहणी केली. या ठिकाणी स्थलांतरीत नागरीकांसाठी पिण्याच्या पाण्याची व लाईटच्या व्यवस्थेची पाहणी केली.
याठिकाणी निवारा केंदाच्या छताला गळती असल्यास ती तातडीने काढण्याच्या सूचना उप-शहर अभियंता यांना दिल्या. तसेच निवारा केंद्राच्या परिसराची, टॉयलेट, बाथरुमची दैनंदिन स्वच्छता करावी. नागरीकांचे स्थलांतर झालेवर आवश्यकता भासल्यास जादा मोबाईल टॉयलेट व्यवस्था करण्याच्या सूचना मुख्य आरोग्य निरिक्षकांना केल्या.
यावेळी शहर अभियंता हर्षजीत घाटगे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, उपशहर अभियंता अरुण गुजर, सुरेश पाटील, मुख्य आरोग्य निरिक्षक डॉ. विजय पाटील उपस्थित होते.