SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
महाविस्तार AI अँपद्वारे शेतीत डिजिटल क्रांती; जिल्ह्यात ७५ हजारांहून अधिक नोंदणीदुचाकी वाहनांची नवी नोंदणी मालिका 25 फेब्रुवारी पासून सुरुलोकप्रतिनिधीच्या सूचना विचारात घेऊन वार्षिक मुल्यदर निश्चित करण्यासाठी प्रस्ताव पाठवावा : जिल्हाधिकारी अमोल येडगेशिवाजी विद्यापीठात बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती‘गोकुळ’ परिवारातील सदस्यांची जि.प. निवड अभिमानास्पद : नविद मुश्रीफ; गोकुळ मार्फत मान्यवरांचा सत्कारकोल्हापुरात 'कव्वाली महोत्सवा'चे २१ फेब्रुवारीपासून आयोजनशिवाजी विद्यापीठात उद्या ‘अकौंन्टन्सी म्युझियम ऑफ इंडिया’चे उद्घाटनशिवाजी विद्यापीठात रविवारी नोकरी महामेळाव्याचे आयोजन; ८००० जागांच्या भरतीसाठी मुलाखती होणार'संशोधन प्रकल्प निधी कसा मिळवावा' या विषयावर शिवाजी वि‌द्यापीठामध्ये उद्या एकदिवसीय कार्यशाळा‘गोकुळ’ कडून म्हैस दूध खरेदी दरात १ रुपये व गाय दूध खरेदी दरात २ रूपये वाढ : चेअरमन नविद मुश्रीफ

जाहिरात

 

लोकप्रतिनिधीच्या सूचना विचारात घेऊन वार्षिक मुल्यदर निश्चित करण्यासाठी प्रस्ताव पाठवावा : जिल्हाधिकारी अमोल येडगे

schedule20 Feb 26 person by visibility 143 categoryराज्य

कोल्हापूर : लोकलेखा समितीने वार्षिक मुल्यदर तक्ते तयार करताना लोकप्रतिनिधीच्या सूचना घेण्याची शिफारस केली असल्याने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीकडून लेखी निवेदने/सूचना पुढील ७ दिवसात मागवून त्यानंतर वार्षिक मुल्यदराचा प्रारुप प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या.

वार्षिक मुल्यदर तक्ते तयार करण्याबाबतची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहू सभागृहात संपन्न झाली. यावेळी आमदार अमल महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, आमदार शिवाजी पाटील यांचे प्रतिनिधी महेश पवार, पुणे नगर रचना मुल्यांकन विभागाचे सहायक संचालक प्र.श्री. बंडगर, जिल्हा मुद्रांक जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी  येडगे म्हणाले, वार्षिक मूल्यदर तक्ते हे दिनांक १ एप्रिल २०२६ ते दिनांक ३१ मार्च २०२७ या आर्थिक वर्षाच्या कालावधीसाठी लागू करण्यात येणार असल्याने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीच्या सूचना विचारात घेवून या सूचना मुद्रांक नियंत्रक,महाराज्य राज्य पुणे चे नोंदणी महानिरीक्षक यांच्याकडे प्रस्तावासाठी पाठवावे. आमदार अमल महाडिक व आमदार चंद्रदीप नरके यांनी वार्षिक मूल्यदर कमीत कमी वाढविण्याबाबत सूचना दिल्या. त्याचबरोबर लोकप्रतिनिधीच्या लेखी निवेदने मागवून घ्या, अशा सूचना नगर रचना विभागास यावेळी दिल्या. यावेळी पुणे नगर रचना मुल्यांकन विभागाचे सहायक संचालक प्र.श्री. बंडगर यांनी वार्षिक मुल्यदराबाबत सादरीकरणाव्दारे माहिती दिली. 

जिल्ह्यातील डिसेंबर २०२४ ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीतील ग्रामीण क्षेत्रातील विचारात घेतलेल्या खरेदी विक्री व्यवहाराचे पृथ:करण ४.९९, प्रभाव क्षेत्रातील ७.३२, नगरपालिका क्षेत्रातील १७.४७, कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील २१.७८,  इचलकरंजी महानगरपालिका, हातकणंगले क्षेत्रातील ०.८३  एवढी सरासरी आहे. 

जिल्ह्यातील विचारात घेतलेल्या (-५० ते २०० टक्के) खरेदी-विक्रीच्या पृथ:करणाचा च्या गोषवारानुसार - ग्रामीण क्षेत्र- ४.९९, प्रभाव क्षेत्र – ७.३२, नगरपरिषद/नगरपंचायत- १७.४७,  कोल्हापूर महानगरपालिका-२१.७८ व इचलकरंजी महानगरपालिका १२.७० सरासरी वाढ कल आहे. तर जिल्ह्यातील एकूण खरेदी-विक्री व्यवहारांच्या संख्येची तुलनात्मक क्षेत्रनिहाय टक्केवारीमध्ये ग्रामीण क्षेत्र २३ टक्के, प्रभाव क्षेत्र ४५, नगरपरिषद १० टक्के, महानगरपालिका २३ टक्के इतकी आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes