केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळून ७ जणांचा मृत्यू
schedule15 Jun 25 person by visibility 282 categoryगुन्हे

नवी दिल्ली : उत्तराखंडच्या केदारनाथमध्ये पुन्हा एकदा हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली. रुद्रप्रयागच्या गौरीकुंड आणि सोनप्रयाग परिसरात हे हेलिकॉप्टर कोसळले. या दुर्घटनेत सात भाविकांचा मृत्यू झालाआहे.
रविवारी पहाटे साडेपाच वाजता हेलिकॉप्टर केदारनाथहून गुप्तकाशीला निघाले होते. आर्यन कंपनीचे हे हेलिकॉप्टर केदारनाथवरून यात्रेकरूंना घेऊन परत जात असताना ही घटना घडली. खराब हवामानामुळे हे हेलिकॉप्टर घनदाट जंगलात कोसळले. एनडीआरएफ आणि एसडीआरएफ पथके घटनास्थळी दाखल झाले आहे.
हेलिकॉप्टरचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले आहेत. या सातही जणांचे मृतदेह शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.उत्तराखंडचे सीएम धामी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत हेलिकॉप्टर अपघातावर दुःख व्यक्त केले आहे.