SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आरोग्य विभागाच्या सर्व्हेक्षणामध्ये 31 घरांमध्ये डेंग्यु आढळलेकोल्हापूर : पर्ल हॉटेल समोरील अनधिकृत फुलवाले केबिनवर अतिक्रमण निर्मुलन पथकामार्फत कारवाईकोल्हापूरी गुळ जगभरात पोहोचण्यासाठी जीआय नोंदणी करा : डॉ. सुभाष घुलेकोल्हापूर येथे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा आढावा; राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिल्या महत्त्वपूर्ण सूचनाडॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला 'व्हेरी गुड' श्रेणीडी. वाय पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवणार : डॉ. संजय डी. पाटील; विद्यापीठाचा पाचवा स्थापना दिवस उत्साहात साजराडी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे ''राष्ट्रीय डॉक्टर डे' उत्साहात; कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्याकडून शुभेच्छाशक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या माथी मारु नका : सतेज पाटील विधानपरिषदेत कडाडले जिल्हाधिकारी लोकशाही दिन सोमवारी 7 जुलै रोजीविमा योजनेतील भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कधी कारवाई करणार ; सतेज पाटील यांचा सवाल : महिन्याच्या आत कारवाईचे कृषीमंत्र्यांचे आश्वासन

जाहिरात

 

‘गोकुळ’तर्फे वारकऱ्यांना लोणंद, फलटण येथे साहित्य वाटप...

schedule28 Jun 25 person by visibility 391 categoryगुन्हे

कोल्हापूर : श्री संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, कोल्हापूर (गोकुळ) यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही सामाजिक जाणीवेने उपक्रम राबवण्यात आला. गुरुवार, दिनांक २६ जून रोजी सातारा जिल्ह्यातील लोणंद व फलटण येथे वारकऱ्यांना दूध पावडर, ५ हजार बॅग, टोपी आणि दिनदर्शिका या साहित्याचे मोफत वाटप गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते व माजी चेअरमन ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक शशिकांत पाटील चुयेकर, बयाजी शेळके व मान्यवरांच्या उपस्थिती करण्यात आले.

 यावेळी गोकुळचे चेअरमन नविद हसन मुश्रीफ म्हणाले कि, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक वारशाचे प्रतीक असलेल्या श्री संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यात गोकुळतर्फे सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत विविध उपक्रम राबवले जात आहेत. पालखी सोहळा हा आपल्या सांस्कृतिक अस्मितेचा भाग आहे यामध्ये जिल्ह्यातील दूध उत्पादक वारकरी म्हणून सहभागी असतात, त्यामुळे या उपक्रमातून  त्यांच्यापर्यंत गोकुळची साथ पोहोचवणे, हे संघाचे सामाजिक कर्तव्य समजूनच हा उपक्रम राबवला जात असल्याचे मनोगत व्यक्त केले.

 या कार्यक्रमावेळी गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक शशिकांत पाटील चुयेकर, बयाजी शेळके, बिद्री साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन मनोज फराकटे, रयत संघाचे चेअरमन सचिन पाटील, माधव पाटील, सुनिल पाटील, राहुल पाटील, मयूर आवळेकर, निलेश शिंदे, मार्केटिंग व्यवस्थापक हणमंत पाटील, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, मार्केटिंग विभागाचे सुनिल गायकवाड, मानसिंग चौगले तसेच विविध दिंडी प्रमुख, वारकरी उपस्थिती होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes